संग्रहित छायाचित्र 
आंतरराष्ट्रीय

ओलिसांच्या सुटकेसाठी हमासवर दबाव; इस्रायलचे गाझावर पुन्हा हल्ले, ९० हून अधिक ठार

इस्रायलने गाझामध्ये पुन्हा एकदा हल्ले सुरू केले असून गेल्या ४८ तासांत करण्यात आलेल्या हल्ल्यात ९० हून अधिक जण ठार झाले आहेत, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. इस्रायलच्या सैन्याने हमासवर ओलिसांच्या सुटकेसाठी आणि नि:शस्त्रीकरण करण्यासाठी दबाव आणला आहे. यामुळे त्यांनी गाझावरील हल्ले वाढवले​आहेत, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

Swapnil S

गाझा पट्टी : इस्रायलने गाझामध्ये पुन्हा एकदा हल्ले सुरू केले असून गेल्या ४८ तासांत करण्यात आलेल्या हल्ल्यात ९० हून अधिक जण ठार झाले आहेत, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. इस्रायलच्या सैन्याने हमासवर ओलिसांच्या सुटकेसाठी आणि नि:शस्त्रीकरण करण्यासाठी दबाव आणला आहे. यामुळे त्यांनी गाझावरील हल्ले वाढवले​आहेत, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये रात्रीच्या वेळी मारले गेलेल्या १५ लोकांचा समावेश आहे. यात महिला आणि मुले आहे. त्यापैकी काही जणांनी मानवतावादी क्षेत्रात आश्रय घेतला होता. दक्षिणेकडील खान युनूस शहरात किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक जण म्वासी भागातील एका तंबूत राहात होते. येथे लाखो विस्थापित लोक राहत आहेत, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. इस्रायलने हा भाग मानवतावादी झोन म्हणून घोषित केला आहे.

युरोपियन हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, रफाह शहरात विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक महिला आणि तिच्या मुलीचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह युरोपियन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत. इस्रायलने गाझामध्ये हल्ले तीव्र करण्याची आणि गाझा पट्टीतील मोठे सुरक्षा क्षेत्र ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून इस्रायलने गाझाची नाकाबंदी केली आहे. त्यांनी गाझामध्ये अन्न आणि इतर वस्तूंच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

या पार्श्वभूमीवर या आठवड्यात, मदतकार्य करणाऱ्या गटांनी हजारो मुले अन्नाविना कुपोषित झाली असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, अन्नधान्याचा साठा कमी होत असल्याने बहुतांश लोकांना दिवसातून एक वेळचे जेवणही मिळत नाही.

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर

राक्षसी बहुमतापेक्षा मोठी जनशक्ती

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य