PTI
आंतरराष्ट्रीय

इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला; २७४ ठार

इस्रायलने लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाविरोधात थेट युद्ध सुरू केले आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात २७४ जणांचा मृत्यू झाला असून ९०० जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य खात्याने दिली.

Swapnil S

जेरूसमेल : इस्रायलने लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाविरोधात थेट युद्ध सुरू केले आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात २७४ जणांचा मृत्यू झाला असून ९०० जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य खात्याने दिली.

इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, आम्ही लेबनॉनवर १५० हवाई हल्ले केले आहेत. त्यात आम्ही हिजबुल्लाच्या तळांना टार्गेट केले. गेल्या वर्षभरापासून इस्रायलचे ‘हमास’ व ‘हिजबुल्ला’ यांच्यासोबत युद्ध सुरू आहे. पण, हिजबुल्लाचे एकाच दिवसात नुकसान होण्याची ही पहिलीच घटना आहे.

लेबनॉनच्या आरोग्य खात्याने सांगितले की, इस्रायलच्या लष्कराने दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले केले. यात २७४ नागरिक ठार झाले व ९०० जण जखमी झाले.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य