आंतरराष्ट्रीय

इस्रायलचा गाझावर सर्वात मोठा हवाई हल्ला, ३२ जण ठार

इस्रायलने पुन्हा एकदा गाझा शहरावर मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात तब्बल ३२ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध कुठपर्यंत चिघळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Swapnil S

देइल अल-बलाह : इस्रायलने पुन्हा एकदा गाझा शहरावर मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात तब्बल ३२ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध कुठपर्यंत चिघळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरू असून इस्रायली लष्करकडून गाझावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला जात आहे. फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह इतरही काही देशांनी पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. यामुळेही इस्रायलने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. काहीही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी जाहीर केलेले आहे. इस्रायलने गाझावर पुन्हा एकदा मोठा हवाई हल्ला त्या हल्ल्याबाबत गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. इस्रायलने २६ सप्टेंबरच्या रात्री गाझावर हवाई हल्ले केले.

पॅलेस्टाईनला मान्यता

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संपावे यासाठी अनेक देशांनी पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे इस्रायलवर एका प्रकारे दबाव वाढलेला आहे. इस्रायलचा मात्र पॅलेस्टाईनला राष्ट्र संबोधण्यास विरोध आहे. इस्रायलच्या याच धोरणाचा विरोध करत अनेक राष्ट्रांनी अमेरिकेने इस्रायलवर दबाव टाका आणि हे युद्ध थांबवावे असे आवाहन केलेले आहे.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान