आंतरराष्ट्रीय

Israel Palestine War : इस्रायलने दिले गाझा पट्टीला वेढण्याचे आदेश ; वीजेसह अन्न पाण्याची रसद तोडली

फक्त तीन दिवसात गाझापट्टीत १ लाख २० हजारांवर विस्थापित झाले आहेत.

नवशक्ती Web Desk

हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. या संघर्षाच्या तिसऱ्या दिवशी(९ऑक्टोबर) देखील इस्रायलकडून गाझापट्टीवनर मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरु आहेत. यात अनेक पॅलेस्टिनी मृत्यूमुखी पडले आहेत. इस्त्रायलने गाझापट्टीतील नागरी वस्त्यांना टार्गेत केलं आहे. गाझापट्टीतील आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार जबिलीया निर्वासित छावणीवर सुद्धा इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला.

इस्त्रायलकडून वरुन बॉम्बवर्षाव सुरु असताना जमिनीवरुनही पूर्णपणे नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात पाणी लाईट खाद्यपुरवठा तोडण्याचे देखील आदेश आहेत. या संघर्षाचा आज तिसरा दिवस आहे. फक्त तीन दिवसात गाझापट्टीत १ लाख २० हजारांवर विस्थापित झाले आहेत. इस्त्रायकडून एक लाख सैन्याची तुकडी गाझापट्टीवर तैनात करण्यात आली आहे. हमासकडून याठिकाणी १३० इस्रायलींना ओलीस ठेवलं असल्याचं सांगितलं जात आहे. इस्त्रायलने केलेल्या हल्यात आतापर्यंत ५१० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहेत. तर इस्त्रायलमध्ये ८०० नागरिक मरण पावल्याचं सांगितलं जात आहे.

हमासच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गाझामध्ये १०० हुन अधिक इस्त्रायलींना ओलीस ठेवलं आहे. हमास अदिकारी मौसा अबू मारझौक यांनी रविवारी अरबी भाषेत याबाबतची माहिती दिली. या ताब्यात घेतलेल्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी देखील असल्याचा दावा करण्यात आला आहे. हल्ला रोखन्यात अपयशी ठरल्याने प्रश्नांचा भडिमार होत असलेल्या इस्रायलच्या सैन्याने गाझाच्या सीमेवरील बहुतेक भागांवर नियंत्रण मिळवलं असून शेकडो लोकांना ठार करत डझनभर कैदी म्हणून घेतलं अलल्याचं सांगितलं आहे.

इस्रायलचा दावा इराणने फेटाळला

इस्रायल सैन्याच्या प्रवक्त्याने केलेल्या दाव्यानुसार इस्रायलने गाझाजवळ 100,000 राखीव सैन्य जमा केले आहे. तर दुसरीकडे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात देखील मोठा दावा करण्यात आला आहे. इराणने हमासला आठवड्याच्या शेवटी इस्रायलविरुद्ध अचानक हल्लाची योजन आखण्यास मदत केली. परंतु संयुक्त राष्ट्रातील इराणच्या मिशनने इस्रायलचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, इराण या हल्ल्यांत सामील नाही. आम्ही पॅलेस्टाईनच्या अखंड समर्थनात ठामपणे उभे आहोत, तथापि आम्ही हल्ल्यात सहभागी नाहीत कारण तो केवळ पॅलेस्टाईनने केला आहे इरानच्या मिशनने एक निवेदन जारी करत याबाबत म्हटलं आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल