आंतरराष्ट्रीय

जपानचे पंतप्रधान इशिबा यांचा राजीनामा

जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीमधील (एलडीपी) फूट टाळण्यासाठी इशिबा यांनी हे पाऊल उचलले, असे वृत्त जपानी माध्यमांनी दिले आहे.

Swapnil S

टोकियो : जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीमधील (एलडीपी) फूट टाळण्यासाठी इशिबा यांनी हे पाऊल उचलले, असे वृत्त जपानी माध्यमांनी दिले आहे. जुलैमध्ये झालेल्या वरिष्ठ सभागृह (कौन्सिलर्स हाऊस) निवडणुकीत इशिबा यांचे युती सरकार पराभूत झाले. इशिबा यांनी अलिकडेच याबद्दल माफी मागितली होती आणि राजीनामा देण्याचा निर्णय आपण घेणार असल्याचे सांगितले होते.

निवडणुकीतील पराभवानंतर एलडीपीमधील 'इशिबाला हटवा' चळवळ तीव्र झाली. पक्षाच्या काही नेत्यांनी आणि खासदारांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यामुळे त्यांची स्थिती कमकुवत झाली होती.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...