एक्स @TdLeaker
आंतरराष्ट्रीय

कॅलिफोर्नियातील वणव्यात १३ लाख कोटींचे नुकसान

कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे लागलेल्या वणव्यात आतापर्यंत १३ लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Swapnil S

लॉस एंजेलिस : कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे लागलेल्या वणव्यात आतापर्यंत १३ लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अमेरिकेत हवामानासंदर्भात सेवा देणारी कंपनी ‘एक्यूवेदर’ने सांगितले की, या आगीमुळे कॅलिफोर्नियाचे १३५ ते १५० अब्ज डॉलर नुकसान झाले. घर, इमारती खाक होण्याबरोबरच पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. या सुविधा बनवण्यासाठी दीर्घकाळ खर्च करावा लागणार आहे. आगीवर नियंत्रण न मिळाल्याने आणखी खर्च वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत १० जणांचा मृत्यू

या आगीत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांत ही आग ४० हजार एकरपर्यंत पसरली आहे. त्यातील २९ हजार एकर भूभाग जळून गेला आहे. तसेच १० हजार इमारती खाक झाल्या आहेत.

प्रशासनाने ५० हजार जणांना त्वरित घरे रिकामी करण्याचे आदेश दिले, तर तीन लाख जणांना सुरक्षित ठिकाणी जायला सांगितले आहे. ही आग आणखी पसरण्याची शक्यता आहे. १ लाख जणांची वीज खंडित करण्यात आली आहे.

लॉस एंजेलिसचे शेरीफ रॉबर्ट लूना म्हणाले की, ही आग बघून वाटते या भागात अणुबॉम्ब पडला आहे.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी