आंतरराष्ट्रीय

...आणि आईने मूल चुकून ओव्हनमध्ये ठेवले

आईने मुलाला झोपण्यासाठी खाली ठेवले आणि चुकून ते अर्भक...

Swapnil S

कन्सास : आईने आपले मूल चुकून ओव्हनमध्ये ठेवल्याने त्या अर्भकाचा मृत्यू झाला, असे वकिलाने शनिवारी मिसुरी न्यायालयात सांगितले. कॅन्सस सिटीच्या मारिया थॉमसवर मुलाचे कल्याण धोक्यात आणल्याचा आरोप होता. त्या संबंधात पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अर्भक श्वास घेत नसल्याच्या अहवालावर सांगितले की, ते मूल भाजलेले आढळले, मूल घटनास्थळीत मरण पावल्याचे घोषित करण्यात आले होते. या संबंधात एका साक्षीदाराने सांगितले की आईने मुलाला झोपण्यासाठी खाली ठेवले आणि चुकून ते अर्भक त्याच्या निजावयाच्या जागी ठेवण्याऐवजी ऐवजी ओव्हनमध्ये ठेवले गेले. मात्र ही चूक कशी झाली याबद्दल निवेदनात स्पष्टीकरण दिलेले नाही.

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

महायुतीच ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबईत युती तर अन्यत्र स्वबळावर लढण्याचे संकेत

आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत निवडणूक लढवायची नाही; काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या विधानानंतर खळबळ

राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरची चाके रुतली, मोठी दुर्घटना सुदैवाने टळली

BARC च्या बनावट वैज्ञानिकाला अटक; अणूबॉम्बच्या आराखड्यासह सुरक्षा भंगाचा संशय