AFP
आंतरराष्ट्रीय

Bangladesh: बांगलादेशच्या हंगामी सरकारच्या प्रमुखपदी मुहम्मद युनूस

बांगलादेशच्या हंगामी सरकारच्या प्रमुखपदी नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली आहे.

Swapnil S

ढाका : बांगलादेशच्या हंगामी सरकारच्या प्रमुखपदी नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली आहे. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी युनूस यांना गुरुवारी रात्री पद व गोपनीयतेची शपथ दिली. हा कार्यक्रम राष्ट्रपती निवासस्थान असलेल्या ‘बंगभवन’ येथे झाला.

युनूस यांच्याबरोबरच आणखी १३ सदस्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथ समारंभात ४०० जण सहभागी झाले होते. या हंगामी सरकारच्या शपथविधी समारंभात सामील होण्यासाठी भारताला आमंत्रण होते. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर अर्थतज्ज्ञ व राजकीय नेते मुहम्मद युनूस यांची हंगामी सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

झारखंडमध्ये ४३ मतदारसंघांत आज पहिल्या टप्प्याचे मतदान; वायनाडमध्येही मतदानाला सुरूवात

फिर एक बार महायुती सरकार! पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

राज्यघटना संपविण्यासाठी संघ, भाजप अहोरात्र कार्यरत; राहुल गांधी यांचा आरोप

मोदी पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत! उद्धव ठाकरे कडाडले

मोदींनी दहशतवाद, नक्षलवाद कायमचा संपवला - शहा