आंतरराष्ट्रीय

दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? कराचीतील रुग्णालयात दाखल असल्याच्या चर्चांना उधाण

Swapnil S

मुंबईत १९९३ साली घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पाकिस्तामधील कराची येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती सध्या चिंताजन असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कराचीत दाऊदला कोणी अज्ञात व्यक्तीने विष दिले आहे. यानंतर त्याती प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊदच्या माजी सहकाऱ्याने केलेल्या पृष्टीनुसार तो गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून रुरग्णालयाच्या ज्या मजल्यावर त्याच्यावर उपचार सुरु आहेत त्याठिकाणी फक्त वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या निकटवर्तीयांना जाण्याची परवानगी आहे.

दाऊचे नातेवाईक असलेल्या आलिशाह पारकर आणि साजित वागळे यांच्याकडून मुंबई पोलीस दाऊदच्या रुग्णालयात भरती होण्याविषयी अधिकची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जानेवारीत दाऊद इब्राहिमची बहिण असलेल्या हसीना पारकरने दाऊद दुसऱ्या लग्नानंतर पाकिस्तानातील कराचीत स्थाईक असल्याची माहिती दिली होती. एनआयएने आपल्या आपोप पत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे तो आणि त्याचे सहकारी मिळून पाकिस्तानमधील कराचीचे विमानतळ नियंत्रित करतात.

दरम्यान, सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेवर पाकिस्तानी न्यूज चॅनल जियो टिव्हीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत अफवा पसरत असल्याचे म्हटले आहे. इतर स्थानिक वृत्तांनुसार दाऊदच्या रुग्णालयात दाखल होण्यामागील कारण अस्पष्ट आहे. कारण भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत पृष्टी केलेली नाही. त्याच्या अचानक रुग्णालयात दाखल होण्यामागे विषबाधेचे कारण सांगितले जात आहे. दाऊद याआधी देखील अनेक आजारांनी ग्रस्त असल्याचे दावे करण्यात आले आहेत. गॅग्रींनमुळे त्याच्या पायाची दोन बोटे देखील कापले असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

दाऊद इब्राहिमवर अज्ञात व्यक्तीने विषप्रयोग केल्याची बातमी पसरल्याने सोशल मीडियावर त्याबाबत वेगवेगळे आणि मजेशीर मीम्स शेअर होत आहेत. दाऊदच्या फोटोला पुष्पहार घालून त्याचा मृत्यू झाला असल्याचेही काही मीम्समधून दाखवले जात आहे.

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

काय सांगता? एप्रिलमध्ये तब्बल ३ लाख लोकांनी खरेदी केली 'ही' बाईक, पाहा लिस्ट

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व