पाकिस्तानची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंदच प्रातिनिधिक छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंदच

भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद ठेवण्याचा कालावधी पाकिस्तानने २४ मे पर्यंत वाढवला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद ठेवण्याचा कालावधी पाकिस्तानने २४ मे पर्यंत वाढवला आहे. गेल्या वर्षी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. या नव्या निर्णयामुळे आता ही बंदी एका वर्षापेक्षा जास्त काळ लागू राहणार आहे.

पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटमध्ये नमूद केल्यानुसार, भारतीय नोंदणीकृत विमाने, भारतीय कंपन्यांच्या मालकीची किंवा भाड्याने घेतलेली विमाने आणि लष्करी विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश मिळणार नाही. ही बंदी २१ ते २४ मे रोजी पहाटे ५:३० वाजेपर्यंत लागू असेल. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारतीय विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रदीर्घ मार्गाचा वापर करावा लागत आहे.

भारतानेही पाकिस्तानच्या विमानांना आपल्या हवाई हद्दीत २४ एप्रिल रोजी पहाटे ५:३० वाजेपर्यंत प्रवेशबंदी केली आहे. ही मुदत लवकरच वाढवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उद्याची TET रद्द; पेपरफुटीच्या संशयावरून राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, भिवंडीत तिघांना अटक

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद