इस्लामाबाद : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात भारताने ड्रोन हल्ले करून लाहोरमध्ये पाकिस्तानची हवाई यंत्रणा उद्ध्वस्त केली होती. भारताच्या अचूक हल्ल्यानंतर पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर वेगाने ड्रोनविरोदी यंत्रणा तैनात करण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानला ‘ऑपरेशन २.०’ सुरू होण्याची भीती आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, रावळकोट, कोटली, भीमबर विभागात नवीन ॲण्टी ड्रोन यंत्रणा बसवण्यात आली आहे. पाकच्या नियंत्रणरेषेवर ३० हून अधिक ॲण्टी ड्रोन यंत्रणा बसवण्यात आली आहे. मुर्रीतील १२ वी इन्फंट्री डिव्हिजन, कोटली-भीमबर येथील २३ व्या इन्फंट्री डिव्हिजनअंतर्गत हे ॲण्टी ड्रोन तैनात केले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, भारताकडून हल्ल्याच्या भीतीमुळेच पाकिस्तानने ही पावले उचलली आहेत. पाकिस्तान आपल्या नागरिकांना मुर्ख बनवत आहे, पण तो आतून घाबरला आहे.