IMF कडून कर्जबाजारी पाकिस्तानला मिळणार १.२ अब्ज डॉलरची मदत 
आंतरराष्ट्रीय

IMF कडून कर्जबाजारी पाकिस्तानला मिळणार १.२ अब्ज डॉलरची मदत

आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडल्याने कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मदतीचा हात दिला आहे. देशातील वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ‘आयएमएफ’ने मंगळवारी पाकिस्तानला कर्ज देण्याची तयारी दर्शविली असून त्याद्वारे पाकिस्तानला १.२ अब्ज डॉलर मिळणार आहेत.

Swapnil S

इस्लामाबाद : आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडल्याने कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मदतीचा हात दिला आहे. देशातील वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ‘आयएमएफ’ने मंगळवारी पाकिस्तानला कर्ज देण्याची तयारी दर्शविली असून त्याद्वारे पाकिस्तानला १.२ अब्ज डॉलर मिळणार आहेत.

या निर्णयामुळे पाकिस्तानला परदेशी चलन साठा वाढवायला आणि महागाई नियंत्रणात ठेवायला मदत होणार आहे. ‘आयएमएफ’ कर्ज देणार असल्यामुळे पाकिस्तानचा जीव भांड्यात पडला आहे. त्यांना परदेशी चलन साठा मजूबत करता येईल. आता बोर्डाच्या मंजुरीनंतर पुढच्या काही दिवसात पाकिस्तानला हा निधी मिळेल. यामुळे पाकिस्तानच्या कमजोर अर्थव्यवस्थेला थोडा दिलासा मिळेल. पाकिस्तानसाठी हा निधी खूप महत्वाचा आहे.

‘आयएमएफ’ने पाकिस्तानला कर्ज देण्यासह काही अटी त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. पाकिस्तानने जास्त कमाई करावी, अशी ‘आयएमएफ’ची इच्छा आहे. पण त्याचवेळी सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा वेग वाढवावा, असेही म्हटले आहे. टॅक्स वसुलीमध्ये सुधारणा, नुकसान कमी करणे आणि आर्थिक सुधारणेचा वेग वाढवण्यावर भर द्यावा, अशी आयएमएफची इच्छा आहे. जगाची स्थिती लक्षात घेऊन पाकिस्तानने आर्थिक समजदाराची धोरणे स्वीकारावी, जेणेकरुन त्यांची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे आयएमएफला वाटते. अशा सुधारणा लागू कराव्यात ज्यात खासगी क्षेत्राच्या मदतीने देशात विकास होईल.

पाकिस्तान आयएमएफ कार्यक्रमातंर्गत आपली मोठी खासगीकरण प्रक्रिया पुढे नेत आहे. कर्जातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान आता आपला एअरपोर्ट विकत आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मागच्या आठवड्यात सांगितले की, पाकिस्तान इंटरनॅशन एअरलाइन्समधील हिस्सेदारी विकण्यासाठी २३ डिसेंबरला बोली लागेल. चार निवडलेल्या समूहांना या बोलीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

‘आयएमएफ’च्या दबावाखाली पाकिस्तानला ‘पीआयए’चा लिलाव करावा लागत आहे. हा एअरपोर्ट खरेदी करण्यासाठी फौजी फर्टिलायजर कंपनी, लकी सिमेंट समूह, आरिफ हबीब कॉर्प आणि एअर ब्लू लिमिटेडसारख्या कंपन्या तयार आहेत.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात