रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा हल्ला Photo : X
आंतरराष्ट्रीय

रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा हल्ला

सुमारे चार वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्याच्या उद्देशाने अमेरिका आणि युक्रेनचे अधिकारी शनिवारी तिसऱ्या दिवशी चर्चा करणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर लगेचच, रशियाने शनिवारी पहाटे युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मोठा हल्ला केला.

Swapnil S

कीव्ह : सुमारे चार वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्याच्या उद्देशाने अमेरिका आणि युक्रेनचे अधिकारी शनिवारी तिसऱ्या दिवशी चर्चा करणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर लगेचच, रशियाने शनिवारी पहाटे युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मोठा हल्ला केला.

युद्धानंतरच्या युक्रेनसाठी सुरक्षा आराखड्यावर प्रगती झाली असल्याची माहिती चर्चेनंतर देण्यात आली. मात्र, कोणत्याही करारासाठी 'खरी प्रगती' ही 'दीर्घकाळ शांतता ठेवण्याची गंभीर बांधिलकी दाखवण्याच्या रशियाच्या तयारीवर' अवलंबून असेल, असे स्पष्ट मत दोन्ही बाजूंनी व्यक्त केले.

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ, ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर आणि युक्रेनियन वार्ताकार रुस्तम उमेरोव्ह व आंद्रे ह्माटोव्ह यांच्या शुक्रवारी फ्लोरिडामध्ये दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीनंतर हे निवेदन आले. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने केलेल्या प्रस्तावाला कीव्ह आणि मॉस्कोने सहमती द्यावी, यासाठी ट्रम्प जोर देत असताना, या प्रगतीबद्दल त्यांनी केवळ ढोबळ माहिती दिली.

युक्रेनच्या हवाई दलाने शनिवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सशस्त्र सेना दिनानिमित्त झालेल्या या हल्ल्यात रशियाने ६५३ ड्रोन आणि ५१ क्षेपणास्त्रे वापरली. यामुळे देशभरात हवाई हल्ल्याचे इशारे जारी करण्यात आले होते. युक्रेनियन सैन्याने ५८५ ड्रोन आणि ३० क्षेपणास्त्रे पाडली किंवा निष्क्रिय केली. या हल्ल्यात एकूण २९ ठिकाणी नुकसान झाले.

BMC महापौर निवडणूक ३१ जानेवारीला; २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

उल्हासनगरमधील 'बहुमत का हुकले?' विरोधक नव्हे, आपलेच ठरले अडसर; अंतर्गत फूटीमुळे राजकीय आत्मघात

मेट्रो लाइन '७ ए'ला मोठी चालना ; २४०० मिमी अपर वैतरणा जलवाहिनी वळवण्याचे काम पूर्ण

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सहमती; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी

स्वतःच्या प्रकल्पांना 'राम कुटीर' नाव का दिले नाही; KEM चे नाव बदलण्यावरून कोल्हेंचा लोढांना सवाल