टोकियो: जपानच्या संसदेने मंगळवारी अतिउजव्या विचारसरणीच्या साने ताकाइची यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी निवड केली. ताकाइची यांनी शिगेरू इशिबा यांची जागा घेतली आहे.
लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या मोठ्या निवडणूक पराभवानंतर सुरू झालेल्या तीन महिन्यांच्या राजकीय ठप्प परिस्थितीला आणि सत्तेसाठीच्या संघर्षाला त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
ताकाइची यांनी २३७ मते मिळवली. म्हणजे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा चार अधिक. 'कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान' च्या प्रमुख योशिको नोडा यांना १४९ मते मिळाली. निकाल जाहीर होताच ताकाइची उठल्या आणि त्यांनी सभागृहासमोर झुकून अभिवादन केले.