आंतरराष्ट्रीय

राईडचा आनंद घेत होते पर्यटक; अचानक खांब तुटला अन्...; सौदी अरेबियात थरारक घटना|Video

सौदी अरेबियातील तैफ जवळील ग्रीन माउंटन पार्कमध्ये बुधवारी एक भीषण अपघात घडला. '३६० डिग्री' राईडचा मध्यवर्ती खांब अचानक तुटल्याने संपूर्ण राईड कोसळली आणि कमीत कमी २३ पर्यटक जखमी झाले.

नेहा जाधव - तांबे

सौदी अरेबियातील तैफ जवळील ग्रीन माउंटन पार्कमध्ये बुधवारी (३० जुलै) एक भीषण अपघात घडला. '३६० डिग्री' राईडचा मध्यवर्ती खांब अचानक तुटल्याने संपूर्ण राईड कोसळली आणि कमीत कमी २३ पर्यटक जखमी झाले. यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे.

या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, पर्यटक '३६० डिग्री' नावाच्या थ्रिल राईडचा आनंद घेत आहेत. अचानक राईडचा मुख्य खांब दोन भागांत तुटतो आणि क्षणात संपूर्ण राईड जोरात जमिनीवर आदळते.

पाहा व्हिडिओ -

या घटनेमुळे राईडमध्ये बसलेले पर्यटक हवेत फेकले गेले, काहीजण थेट जमिनीवर आपटले, तर काहींना राईडच्या तुटलेल्या भागाने धडक दिली. Times Now ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, खांब मागे झुकत गेला आणि बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर आपटला.

ही दुर्घटना हादा परिसरात घडली. आपत्कालीन सेवांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी तपास सुरू केला असून, राईड तुटण्यामागचं खरं कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर सौदीतील नागरिकांनी सोशल मीडियावर सुरक्षा उपायांबाबत संताप व्यक्त केला आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर