आंतरराष्ट्रीय

पीएमओ, रिलायन्स, एअर इंडियाची गुप्त कागदपत्रे चोरली; चिनी हॅकर्सचा दावा

सार्वजनिक सुरक्षा खात्याशी संबंधित कथित सायबर सुरक्षा कंत्राटदार ‘आय-सून’ ही कंपनी आहे.

Swapnil S

बीजिंग : चीनच्या एका हॅकर्सच्या ग्रुपने भारताचे पंतप्रधान कार्यालय, रिलायन्स इंडस्ट्रीज व एअर इंडियाची गुप्त कागदपत्रे चोरल्याचा दावा केला आहे. यामुळे देशभरात खळबळ माजली आहे. भारत-चीन दरम्यान सीमावाद पेटलेला असतानाच एपीटी या हॅकर्स ग्रुपने मे २०२१ व ऑक्टोबर २०२१ दरम्यान राष्ट्रपतींच्या अंतर्गत विविध खात्याकडून ५.४९ जीबी डेटा चोरल्याचा दावा केला.

चिनी सरकारशी संबंधित असलेल्या ‘आय-सून’ने हजारो कागदपत्रे, फोटो आणि चॅट पोस्ट केले आहेत. सार्वजनिक सुरक्षा खात्याशी संबंधित कथित सायबर सुरक्षा कंत्राटदार ‘आय-सून’ ही कंपनी आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या दोन कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ‘आय-सून’ आणि चिनी पोलिसांनी फाइल्स कशा ‘फुटल्या’ हे शोधायला तपास सुरू केला आहे.

एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आयसूनने २१ फेब्रुवारी रोजी ‘लीक’संदर्भात बैठक घेतली होती. त्यांना सांगितले की, त्याचा व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही आणि त्यांनी त्यांचे काम सामान्य पद्धतीने सुरू ठेवावे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी