PM
आंतरराष्ट्रीय

कुडनकुलम प्रकल्पासंबंधी करारावर स्वाक्षरी

Swapnil S

मॉस्को : भारत आणि रशिया यांनी मंगळवारी तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या भविष्यातील वीज निर्मिती युनिट्सच्या बांधकामाशी संबंधित महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले.

रशियाच्या नेतृत्वासोबत बैठका घेण्यासाठी रशियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी येथे ही घोषणा केली. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडूमध्ये रशियाच्या तांत्रिक सहाय्याने बांधला जात आहे. मार्च २००२ मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. फेब्रुवारी २०१६ पासून कुडनकुलम एनपीपीचे पहिले पॉवर युनिट त्याच्या १००० मेगावॅट क्षमतेवर कार्यरत आहे. रशियन माध्यमांनुसार २०२७ मध्ये प्लांट पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सुरवात करेल अशी अपेक्षा आहे.

जयशंकर म्हणाले की, भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक झोन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर वैयक्तिक वाटाघाटी सुरू करण्यासाठी त्यांचे वाटाघाटी करणारे संघ जानेवारीच्या अखेरीस भेटतील यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली आहे. रशिया आणि भारत यांच्यातील पेमेंट समस्येवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, असामान्य परिस्थितीत आम्ही बँका एकमेकांशी व्यवहार करण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त