श्रीलंकेत मोठी घडामोड; वर्ल्डकप विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगाला होणार अटक; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण? Photo- X (@ani_digital)
आंतरराष्ट्रीय

Arjuna Ranatunga: श्रीलंकेत मोठी घडामोड; वर्ल्डकप विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगाला होणार अटक; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

अर्जुन रणतुंगा आणि त्यांचा भाऊ धम्मिका रणतुंगा या दोघांनाही अटक करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. अर्जुन रणतुंगा परदेशातून परतताच त्यांना अटक करण्यात येईल.

Krantee V. Kale

श्रीलंकेला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार आणि माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. अर्जुन रणतुंगा आणि भाऊ धम्मिका रणतुंगा यांच्यावर तेल खरेदी करारांच्या प्रक्रियेत बदल केल्याचा आणि जास्त किमतीत स्पॉट खरेदी केल्याचा आरोप आहे.

८० कोटी रुपयांचे नुकसान, परदेशातून परतताच बेड्या?

लाचलुचपत आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाने (CIABOC) सोमवारी (दि.१५ डिसेंबर) न्यायालयात सांगितले की, २०१७ मध्ये केलेल्या २७ तेल खरेदी व्यवहारांमुळे सरकारने एकूण ८०० दशलक्ष श्रीलंकन ​​रुपये ( ₹२३.५ कोटी) गमावले. या प्रकरणात, अर्जुन रणतुंगाचे मोठे भाऊ धम्मिका रणतुंगा यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले. अर्जुन रणतुंगा सध्या परदेशात आहेत आणि ते श्रीलंकेत परतल्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल. अशी माहिती अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली.

काय आहे प्रकरण?

अर्जुन रणतुंगा यांच्यावर श्रीलंकेतील सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (CPC)चे अंदाजे ८० कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, २०१७-१८ दरम्यान सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या इंधन खरेदीसाठी तीन दीर्घकालीन निविदा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर, जास्त किमतीत स्पॉट निविदा जारी करण्यात आल्या. भ्रष्टाचार विरोधी आयोगाने, कोलंबो दंडाधिकारी असांगा बोडारागामा यांना सांगितले की, या प्रकरणात धम्मिका रणतुंगा पहिला आरोपी आहे. तर, अर्जुन रणतुंगा हा दुसरा आरोपी आहे. सध्या अर्जुन परदेशात आहे आणि ते परतल्यावर त्यांना अटक केली जाईल. धम्मिका रणतुंगा यांना १५ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर, राष्ट्रपतींचे वकील सलिया पियरिस यांनी न्यायालयाला सांगितले की, धम्मिका तपासात पूर्ण सहकार्य करत आहे म्हणून त्यांना जामिनावर सोडण्यात यावे. यावर, मुख्य दंडाधिकाऱ्यांनी धाम्मिका यांना प्रत्येकी १० लाख रुपयांच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आणि परदेश प्रवासावर बंदी घातली. धम्मिका रणतुंगा हे श्रीलंका सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे श्रीलंका आणि अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे.

श्रीलंका सरकारची भ्रष्टाचारविरोधात मोहिम

रणतुंगा बंधूंविरुद्धचा खटला हा राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमेचा एक भाग आहे. अनुरा कुमार दिसानायके गेल्या वर्षी सत्तेत आले तेव्हा त्यांनी भ्रष्टाचारविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. रणतुंगा यांचे दुसरे भाऊ आणि माजी पर्यटन मंत्री प्रसन्ना यांना गेल्या महिन्यात एका विमा घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. जून २०२२ मध्ये त्यांना एका व्यावसायिकाकडून पैसे उकळल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना दोन वर्षांच्या निलंबित तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

क्रिकेटमधील मोठा वारसा

६२ वर्षीय अर्जुना रणतुंगा हे डावखुरे फलंदाज होते. त्यांनी १९९६ मध्ये श्रीलंकेला क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला होता. श्रीलंकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून पहिला एकदिवसय विश्वचषक जिंकला होता. ही श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी मानली जाते.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane : खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय, विशेष समितीची स्थापना

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?