आंतरराष्ट्रीय

इसिसचा प्रमुख नेता

ड्रोन हल्ल्यात ठार

नवशक्ती Web Desk

दमास्कस : अमेरिकन लष्कराने ‘इसिस’चा प्रमुख नेता उसामाह अल-मुहाजिर याला ड्रोन हल्ल्यात ठार केले आहे, अशी माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे.

सीरियाच्या पूर्व भागात लक्ष्य करून मुहाजिरला ठार केले. शुक्रवारी ‘एमक्यू-९’ ड्रोनचा वापर करून हा हल्ला केला. दोन तास चाललेल्या या घटनेत ड्रोनला रशियन विमानाचा हस्तक्षेपाचा सामना करावा लागला. त्यानंतर ड्रोनने आपले लक्ष्य भेदले. दरम्यान, अमेरिकन हवाई दलाने सीरियात सक्रिय असलेल्या रशियन हवाई दलाच्या कारवाईचा निषेध केला. रशियन हवाई दलाचे वर्तन हे अव्यावसायिक व असुरक्षित आहे. हवाई दलाच्या कमांडर लेफ्टनंट जनरल एलेक्स ग्रीनकेविच म्हणाले की, रशियन वैमानिकांनी जाणुनबुजून आपले विमान ड्रोनच्या समोर तैनात केले. त्याच्या संचलनात जाणूनबुजून बाधा आणली.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली