आंतरराष्ट्रीय

जगाची लोकसंख्या उद्या ८०० कोटींवर; भारतीयांचा वाटा १४२ कोटींचा

Swapnil S

नवी दिल्ली : उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. १ जानेवारीच्या मध्यरात्री जगाची लोकसंख्या ८०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. २०२३ मध्ये १ जानेवारी, २०२४ ला जगाची लोकसंख्या ८,०१९,८७६,१८९ झाली असेल तर २०२३ मध्ये यात ७५,१६२,५४१ लोकांची भर पडली आहे. अमेरिकेच्या लोकसंख्या ब्युरोच्या अहवालावरून हा दावा केला जात आहे. गेल्या एकाच वर्षात ७.५ कोटींची वाढ हा आकडा जगभरातील तज्ज्ञांना अचंबित करणारा आहे. जागतिक लोकसंख्येचे घड्याळ दर सेकंदाला ४.३ जन्म आणि २ मृत्यू या दरावर स्थिर आहे. मात्र जागतिक विकासदर गेल्या काही वर्षांच्या तुलनेत २०२३ मध्ये एक टक्क्याने कमी झाला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये फोर्ब्जच्या एका अहवालानुसार २०२२ मध्ये जगाची लोकसंख्या ७०० कोटी होती. त्यात १०० कोटींची भर पडायला ११ वर्षे लागली. यूएनच्या महासचिव एंटोनिया गुटेरेस यांनी लोकसंख्या वाढीसाठी वैज्ञानिक प्रगती, चांगला आहार, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेमध्ये झालेल्या सुधारणेमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले.

लोकसंख्या ब्युरोच्या अंदाजानुसार घटता जननदर आणि घटलेले लैंगिक गुणोत्तर या कारणांमुळे या नंतर पुढचा १०० कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी, म्हणजे जगाची लोकसंख्या ९०० कोटी होण्यासाठी आणखी १४ वर्षांहून थोडा अधिक काळ लागणार आहे, तर एक हजार कोटी, म्हणजे १० बिलियनपर्यंत पोहोचायला १६.४ वर्षे लागतील. करोनाच्या साथीमुळे लोकसंख्येवर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. २०२१ मध्ये जागतिक सरासरी आयुष्यमान कमी होऊन ते ७१ वर्षांवर आले आहे.

भारतीयांचा वाटा १४२ कोटींचा

या लोकसंख्येत भारतीयांच्या लोकसंख्येचा वाटा १४२.८ कोटी आहे. युरोपची एकूण लोकसंख्या ७४. ४ आहे तर अमेरिकेची १०० कोटी. भारताची लोकसंख्या १९६० ते १९८० या दरम्यान प्रचंड वेगाने वाढली. भारतात २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाच्या साथीमुळे ती होऊ शकली नव्हती. त्यामुळे लोकसंख्येचा नेमका आकडा आज तरी सांगता येत नाही.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस