संग्रहित छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांची अखेर माघार; फळे, चहा, कॉफी, गोमांसावरील टॅरिफ मागे घेण्याची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय बूमरँग झाल्याचे दिसत असून अमेरिकेमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांनी फळे, बीफ, चहा, कॉफी यासारख्या खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे घेण्याची घोषणा केली असून त्याबाबतच्या निर्णयावर स्वाक्षरीही केली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय बूमरँग झाल्याचे दिसत असून अमेरिकेमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांनी फळे, बीफ, चहा, कॉफी यासारख्या खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे घेण्याची घोषणा केली असून त्याबाबतच्या निर्णयावर स्वाक्षरीही केली आहे.

अमेरिकेमध्ये महागाई गगनाला भिडली असून जीवनावश्यक वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत. सर्वसामान्य लोक ट्रम्प यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत, अमेरिकेमध्ये कोणत्याही क्षणी मोठ्या आंदोलनाला सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती आहे. ट्रम्प यांना आपल्या या निर्णयाचा फटका यापूर्वीच न्यूयार्कच्या महापौराच्या निवडणुकीमध्ये बसला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आहे, याचा फटका हा सध्या दोन्ही देशांना बसत असल्याचे दिसून येत आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर टॅरिफ लावल्याचे अनेकदा ट्रम्प यांनी सांगितले आहे. तसेच भारताने रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी आपली भूमिकाही अनेकदा त्यांनी मांडली आहे. भारत आणि चीनकडून मिळालेल्या पैशांचा वापर रशिया हा युक्रेनविरोधातील युद्धामध्ये करत आहे, त्यामुळे युद्धविराम होत नसल्याचा आरोप देखील ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेत ज्या पद्धतीने आता महागाई वाढत आहे, ते पाहून ट्रम्प हे आता लवकरच भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या खाद्यपदार्थांवर असलेला टॅरिफ मागे घेणार असल्याची बातमीही समोर येत आहे. त्यांनी याबाबत यापूर्वीही अनेकदा संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर त्याचा मोठा परिणाम हा भारत आणि अमेरिकेच्या व्यापारावर झाला असून, भारताचा चीन आणि रशियासोबत व्यापार वाढला आहे, याचा सर्वात मोठा फटका हा महागाईच्या रुपाने अमेरिकेला बसत असून, लवकरच भारताच्या टॅरिफबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

Solapur : धक्कादायक! "कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे"; स्टोरी ठेवत तरुणाची आत्महत्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट! शालेय सहलींसाठी राज्य परिवहनच्या नवीन बसेस; भाड्यात तब्बल ५०% सवलत

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी