आंतरराष्ट्रीय

Twitter lays off employees in India : कॉस्ट कटिंगच्या नावाखाली एलॉन मस्कने ट्विटरच्या भारतीय टीमला दाखवला बाहेरचा रस्ता!

ट्विटर (Twitter) कंपनी ताब्यात घेतल्यानंतर प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी घेतलेल्या कठोर पावलांची चांगलीच चर्चा सुरु आहे.

प्रतिनिधी

ट्विटर (Twitter) कंपनी ताब्यात घेतल्यानंतर प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी घेतलेल्या कठोर पावलांची चांगलीच चर्चा सुरु आहे (Twitter lays off employees in India). सर्व कर्मचाऱ्यांना मेल करून कामगार कपातीचे संकेत दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरच्या भारतीय टीमला आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या टीममध्ये २५० कर्मचारी होते. कंपनीने कर्मचार्‍यांना हा मेल पाठवून कॉस्ट कटिंगचे कारण पुढे केले आहे.

ट्विटरच्या ७,५०० कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये भारतीय टीमचादेखील समावेश आहे. इंजिनिअरिंग, सेल्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन टीममधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तर, कंत्राटावर असणार्‍या काही कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर ठेवण्यात आले आहे. कंपनीच्या पब्लिक पॉलीसी टीममध्ये काम करणारे यश अग्रवला यांनी ट्विट करून आपल्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले होते.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण