अमेरिकेत हवाई शोदरम्यान दोन नौदल विमानांची भीषण धडक 
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत हवाई शोदरम्यान दोन नौदल विमानांची भीषण धडक

पश्चिम आयडाहोमधील 'माऊंटेन होम एअर फोर्स बेस'वर रविवारी एका हवाई शोदरम्यान नौदलाच्या दोन विमानांची हवेत भीषण धडक झाली.

Swapnil S

बोईस : पश्चिम आयडाहोमधील 'माऊंटेन होम एअर फोर्स बेस'वर रविवारी एका हवाई शोदरम्यान नौदलाच्या दोन विमानांची हवेत भीषण धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही विमानांमधील सर्व ४ क्रू मेंबर्स सुरक्षितपणे बाहेर पडले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

अमेरिकेच्या नौदल हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, वॉशिंग्टनच्या व्हिडबे आयलंड येथील 'इलेक्ट्रॉनिक अटॅक स्क्वाड्रन १२९' मधील दोन 'यूएस नेव्ही ईए१८-जी ग्रोवलर्स' विमानांचा यामध्ये समावेश होता. ही विमाने हवाई कसरतींचे प्रात्यक्षिक दाखवत असताना हा अपघात घडला. दोन्ही विमानांतील चारही क्रू मेंबर्स सुरक्षितपणे बाहेर पडले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातानंतर एअर फोर्स बेस ताबडतोब लॉकडाऊन करण्यात आला आणि उर्वरित हवाई शो रद्द करण्यात आला, अशी माहिती बेस प्रशासनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

बोईसच्या दक्षिणेस सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या तळाजवळ विमाने जमिनीवर कोसळत असताना आकाशात ४ पॅराशूट उघडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोस्ट केलेल्या व्हिडीओंमध्ये दिसत आहे. दोन्ही विमानांचे क्रू मेंबर्स सुरक्षित बाहेर पडणे ही उल्लेखनीय बाब आहे. हवेत धडक झाल्यानंतरही विमाने एकमेकांना अडकून राहिल्यामुळे कदाचित हे शक्य झाले असावे, कारण सहसा अशा अपघातांत बाहेर पडण्याची संधी मिळत नाही.

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

Mumbai Property Tax : मालमत्ता कराचे बिल आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर; BMC ची नवी डिजिटल सेवा लवकरच सुरू

वाशिममध्ये मध्यरात्री भीषण आग! काही मिनिटांत चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, VIDEO