दुबई : संयुक्त अरब अमिराती (यूएई) सरकारने ‘गोल्डन व्हिसा’साठी नवीन प्रकार सुरू केला आहे. काही अटींसह जो नामनिर्देशनावर आधारित असेल. सध्याच्या ‘गोल्डन व्हिसा’ हवा असल्यास मालमत्ता किंवा व्यवसायात मोठी गुंतवणूक करावी लागते.
आत्तापर्यंत, भारतातून दुबईचा गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठीची किमान अरब अमिरातीचे डॉलर २ दशलक्ष (₹४.६६ कोटी) किमतीची मालमत्ता खरेदी करणे किंवा देशात मोठी व्यावसायिक गुंतवणूक करणे अशी होती.
नवीन “नामनिर्देशन-आधारित व्हिसा धोरणा”अंतर्गत, भारतीयांना आता एक लाख अरब अमिरातीचे डॉलर भरून (२३.३० लाख) शुल्क भरून आजीवन गोल्डन व्हिसा मिळू शकतो, अशी माहिती देण्यात आली. येत्या तीन महिन्यांत ५ हजारांहून अधिक भारतीय नागरिक या नामनिर्देशन-आधारित व्हिसासाठी अर्ज करणार आहेत.
या व्हिसाच्या चाचणीसाठी भारत आणि बांगलादेशची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली आहे आणि रायाद ग्रुप नावाच्या सल्लागार संस्थेला भारतात ही प्रक्रिया चाचणी म्हणून राबवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
रायाद ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रायाद कमाल अयुब म्हणाले, “भारतीयांसाठी हा यूएईचा गोल्डन व्हिसा मिळवण्याचा सुवर्णसंधी आहे. जेव्हा एखादा अर्जदार या व्हिसासाठी अर्ज करेल, तेव्हा आम्ही प्रथम त्याची पार्श्वभूमी तपासू. ज्यात मनी लाँड्रिंगविरोधी व गुन्हेगारी इतिहास तपास, तसेच सामाजिक मीडिया तपासणी समाविष्ट असेल,” असे ते म्हणाले.
या तपासणीमधून अर्जदार यूएईच्या बाजारपेठेला व व्यावसायिक क्षेत्राला कोणत्या प्रकारे फायदेशीर ठरू शकतो जसे की संस्कृती, वित्त, व्यापार, विज्ञान, स्टार्टअप्स, व्यावसायिक सेवा इ. आदींची चाचपणी केली जाईल. त्यानंतर, रायाद ग्रुप हा अर्ज यूएई सरकारकडे सादर करेल आणि अंतिम निर्णय सरकारकडून घेतला जाईल,” ते म्हणाले.
नामनिर्देशन श्रेणीतून गोल्डन व्हिसासाठी अर्ज करणारे अर्जदार त्यांच्या मूळ देशातून दुबईला प्रत्यक्ष न जाता पूर्व-मंजुरी मिळवू शकतात.आमच्या नोंदणीकृत कार्यालये, आमचा ऑनलाईन पोर्टल किंवा कॉल सेंटरद्वारे अर्ज सादर करता येतील, असे ते म्हणाले.
यूएई सरकारचा हा उपक्रम आणि भारताची पहिल्या देश म्हणून निवड हे भारत-यूएईमधील वाढत्या व्यापारिक, सांस्कृतिक आणि भूराजकीय संबंधांचे प्रतिबिंब आहे. हे संबंध मे २०२२ पासून प्रभावी असलेल्या ‘समग्र आर्थिक भागीदारी करारा’ नंतर अधिक मजबूत झाले आहेत.
गोल्डन व्हिसासाठी नामनिर्देशन प्रक्रिया ही यूएई आणि त्याच्या सीईपीए सहसंधी देशांमधील करारावर आधारित आहे. हे एक प्रायोगिक प्रकल्प आहे, जो भारत व बांगलादेशपासून सुरू झाला असून लवकरच चीन व अन्य सीईपीए देशांमध्ये विस्तारणार आहे.
गोल्डन व्हिसा कायम राहणार
गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर अर्जदार त्याचे कुटुंबीय दुबईत आणू शकतात. या व्हिसावर तुम्ही नोकर, चालक ठेवू शकता. येथे कोणताही व्यवसाय किंवा व्यावसायिक काम करू शकता,” कमाल म्हणाले. मालमत्ताधारित व्हिसा मालमत्ता विकल्यास किंवा विभागल्यास रद्द होतो, पण नामनिर्देशन-आधारित व्हिसा कायमस्वरूपी राहतो.