संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प नरमले, पण चीनवर अजूनच भडकले! भारतासह ७५ देशांना मोठा दिलासा, मात्र चिनी वस्तूंवर तब्बल १२५ टक्के टॅक्स

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू झालेले 'टॅरिफ वॉर' दिवसेंदिवस चिघळत असून आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील कर तात्काळ १२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

Krantee V. Kale

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू झालेले 'टॅरिफ वॉर' दिवसेंदिवस चिघळत असून आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील कर तात्काळ १२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी त्यांनी अन्य ७५ देशांना मात्र दिलासा देताना नवीन परस्पर शुल्क (reciprocal tariffs) तात्पुरते स्थगित (९० दिवस) केल्याचेही सांगितले.

"चीनने जागतिक बाजारपेठेचा अनादर केल्यामुळे, मी अमेरिकेने चीनवर आकारलेला कर १२५% पर्यंत वाढवत आहे, जो तात्काळ लागू होईल. अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस आता संपलेत, हे चीनला लवकरच समजेल अशी अपेक्षा आहे," असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर म्हटले आहे.

७५ देशांसह भारतालाही दिलासा

"ज्या ७५ देशांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आणि वाटाघाटीसाठी बोलावले आहे आणि कोणत्याही प्रकारे अथवा स्वरूपात अमेरिकेला प्रत्युत्तर दिलेले नाही, त्या देशांसाठी परस्पर शुल्काला (reciprocal tariffs) ९० दिवसांसाठी तात्पुरता विराम द्यावा आणि या कालावधीत कर १०% इतका लक्षणीयरीत्या कमी करण्याचा अधिकार आहे, जो तात्काळ प्रभावी आहे", असेही ट्रम्प यांनी जाहीर केले. अमेरिकेशी व्यापार चर्चा, वाटाघाटी करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. त्यामुळे भारतालाही दिलासा मिळालाय.

कसा वाढत गेला अमेरिका-चीनमधील तणाव?

अमेरिकेने जगभरातील देशांवर परस्पर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीननेही अमेरिकेप्रमाणेच तेथील वस्तूंवर (अमेरिकेतून आयात होणाऱ्या) ३४ टक्के शुल्क आकारण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ८ एप्रिलपर्यंत जर चीनने अमेरिकन वस्तूंवर लावलेले ३४ टक्के शुल्क हटवले नाही तर अमेरिका चिनी वस्तूंवर ५० टक्के शुल्क आकारेल, अशी सक्त ताकीद ट्रम्प यांनी दिली होती. तथापि, आम्ही अमेरिकेचे ब्लॅकमेलिंग कदापि स्वीकारणार नाही. अमेरिकन टॅरिफच्या विरोधात आम्ही शेवटपर्यंत लढू असे प्रत्युत्तर चीनने दिले होते. नंतर, १० एप्रिलपासून अमेरिकन वस्तूंवरील शुल्क ३४ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या चिनी वस्तूंवर तब्बल १२५ टक्के कर लादला आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव