वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने ते विलगीकरणात राहून काम करतील, असे व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीने सध्या वेग घेतला असून रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांना कडवे आव्हान दिले आहे.
बायडेन यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते टीकेचे लक्ष्य झाले असून त्यांना पक्षांतर्गत विरोधालाही तोंड द्यावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर ते कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्या प्रचारावर परिणाम होणार असून त्यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव वाढत आहे.