अमेरिकेकडून १७ टक्के टॅरिफ प्रस्तावित संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेकडून १७ टक्के टॅरिफ प्रस्तावित

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (यूएसटीआर) भारतीय वस्तूंवर १७ टक्के आयात शुल्क प्रस्तावित केले आहे. भारतात औद्योगिक उत्पादनांची अतिरिक्त क्षमता निर्माण झाल्याचा दावा करत, अमेरिकी कंपन्यांना त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे कार्यालयाने म्हटले आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (यूएसटीआर) भारतीय वस्तूंवर १७ टक्के आयात शुल्क प्रस्तावित केले आहे. भारतात औद्योगिक उत्पादनांची अतिरिक्त क्षमता निर्माण झाल्याचा दावा करत, अमेरिकी कंपन्यांना त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे कार्यालयाने म्हटले आहे. भारतासोबत व्यापार करार न झाल्यास हे शुल्क २५ टक्के राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेने १६ अर्थव्यवस्थांना लक्ष्य करत अतिरिक्त औद्योगिक उत्पादन क्षमतेसंदर्भात सुरू केलेल्या कलम ३०१ अंतर्गत तपासणीचा हा भाग आहे.

प्रस्तावित शुल्क हे सक्तीच्या मजुरीविरोधातील उपाययोजना किंवा विशिष्ट क्षेत्रांवर लागू असलेल्या विद्यमान शुल्कांव्यतिरिक्त आकारले जाणार नाही, असे वृत्त ‘अॅक्सिओस’ने वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. अमेरिकेच्या उद्योगांना हानी पोहोचवणाऱ्या अतिरिक्त उत्पादनामुळे वस्तूंच्या किमती कमी होत असल्याचा आरोप करत यूएसटीआर गेल्या काही महिन्यांपासून १६ देशांच्या धोरणांचा आढावा घेत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

४२ लाख शेतकऱ्यांना मोफत धान्य; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

पाच वर्षांत १०० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे लक्ष्य; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार; महापौर परिषदेचे उद्घाटन

पायाभूत क्षेत्राला बूस्टर; केंद्र सरकारची ११ हजार कोटींची तरतूद; उपकरण उत्पादनाला मिळणार चालना

पुण्यात कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! शिवाजीनगर न्यायालयासमोर गँगवॉर, कोयत्याने हल्ला

पुण्यात भरधाव टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले; अन्य दोन जखमी, बोपदेव घाटात दुर्घटना