आंतरराष्ट्रीय

अमेरिकेकडून युक्रेनला क्लस्टर बॉम्बचा पुरवठा - पुतिन यांची संतप्त प्रतिक्रिया

नवशक्ती Web Desk

मॉस्को : अमेरिकेने युक्रेनला वादग्रस्त क्लस्टर बॉम्ब पुरवण्यास सुरुवात केली असून, त्यावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेनने जर रशियाविरुद्ध क्लस्टर बॉम्बचा वापर केला, तर आमच्याकडेही प्रतिहल्ल्यासाठी पुरेसे क्लस्टर बॉम्ब आहेत, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.

क्लस्टर बॉम्ब हे अत्यंत घातक शस्त्र आहे. त्यात एका मोठ्या आवरणात शेकडो लहान बॉम्ब भरलेले असतात. विमानातून हे बॉम्ब टाकले असता त्यांचा जमिनीपासून काही अंतरावर हवेत स्फोट होतो आणि त्यातून शेकडो लहान बॉम्ब विस्तृत प्रदेशात पसरतात. अनेकदा त्यातील काही बॉम्ब न फुटता जमिनीत तसेच राहतात आणि सुरुंगांप्रमाणे नंतर फुटून हानी करतात. त्यामुळे २००८ सालच्या ऑस्लो करारानुसार अनेक देशांनी त्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र, अमेरिका, रशिया आणि युक्रेनने त्या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. युक्रेनला दारुगोळ्याची कमतरता भासत असल्याने अमेरिकेने हे वादग्रस्त बॉम्ब पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्याचा जर रशियाविरुद्ध वापर झाला तर जशास तसे उत्तर देण्याची धमकी पुतिन यांनी दिली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस