अमेरिकेला जाण्यासाठी आता सोशल मीडिया खात्यांची तपासणी होणार 
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेला जाण्यासाठी आता सोशल मीडिया खात्यांची तपासणी होणार; १५ डिसेंबरपासून नियम लागू

ज्यांना अमेरिकेचा एच वन बी व्हिसा आणि एच फोर व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मिडिया खात्यांची तपासणी केली जाणार आहे. हे नियम १५ डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत.

Swapnil S

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये मेक अमेरिका ग्रेट अगेन धोरण राबवले आहे. त्यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी एचवन बी व्हिसाचे शुल्क ८८ लाख रुपये केले. त्यानंतर आता अमेरिकेने व्हिसासाठी नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार ज्यांना अमेरिकेचा एच वन बी व्हिसा आणि एच फोर व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मिडिया खात्यांची तपासणी केली जाणार आहे. हे नियम १५ डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत.

अमेरिकेत जायचे असेल तर सोशल मीडियावर जपून पोस्ट करणे गरजेचे आहे. कारण, अमेरिकन व्हिसा मिळवताना सोशल मीडिया तपासला जाणार आहे. एच वन बी व्हिसा आणि एच फोर व्हिसा देण्यासाठी अर्जदारांची सोशल मीडिया खाती तपासली जाणार आहेत. यामुळे ज्या अर्जदारांची खाती प्रायव्हेट असतील ती पब्लिक करावी लागणार आहेत. ज्यामुळे अमेरिकन यंत्रणा सोशल मीडिया खाती तपासू शकतात. अमेरिकेविरोधात, अमेरिकेतील राजकीय चळवळीवर अथवा अतिरेकी विचारांचे समर्थन केले असल्यास व्हिसा मिळणार नाही.

अमेरिकेच्या व्हिसा मंजूर करणाऱ्या विभागाकडून अर्जदारांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील प्रोफाईल, पब्लिक पोस्टची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक व्हिसा अर्ज मंजूर करताना राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेचा व्हिसा हा बहुमान आहे मात्र अधिकार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

IndiGoची मोठी घोषणा; प्रवाशांचे पैसे परत मिळणार, री-शेड्युलिंग शुल्क शून्य

नाशिकच्या १८०० झाडांवर कुऱ्हाड? मनसेनंतर आदित्य ठाकरेंची एंट्री; भाजप-बिल्डर लॉबीवर घणाघात, "भाजपच्या बिल्डर मित्रांची...

Thane : भिवंडीत डॉ. बाबासाहेबांच्या श्रद्धांजली बॅनरचा अपमान; दोघांविरोधात गुन्हा दाखल

महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबेडकरांना अभिवादन; "त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत...

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी झाली सरवणकरांची सून; लग्नानंतर नवदाम्पत्य पोहचलं सिद्धिविनायक मंदिरात! पाहा खास Photos