अयातुल्लाह खामेनी यांचे संग्रहित छायाचित्र 
आंतरराष्ट्रीय

इस्त्रायलचा खात्मा करणार; इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची गर्जना

इस्त्रायल कधीही हमास किंवा हिजबुल्लाचा पराभव करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. जगातील मुसलमानांनी शत्रूच्याविरोधात एकत्र व्हावे. तसेच इस्त्रायलचा मुकाबला करण्यासाठी अरब देशांनीही एकत्र यायला हवे, कारण इस्त्रायलचा खात्मा करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

Swapnil S

तेहरान : इस्त्रायलच्या हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाहच्या मृत्यूने इराणचा तीळपापड झाला आहे. इस्त्रायलचा खात्मा करणारच, अशी गर्जना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी केली आहे.

इस्त्रायलच्या हल्ल्याच्या भीतीने नसरल्लाहच्या मृत्यूनंतर शुक्रवारी त्याचा दफनविधी गुप्तपणे पार पाडला. कारण त्याच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी जमण्याचा अंदाज होता. नसरल्लाहला ज्यावेळी दफन केले जात होते, तेव्हा इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी त्याच्या स्मरणार्थ नमाज अदा केली. त्यावेळी मशिदीसमोर उपस्थित असलेल्या हजारो लोकांसमोर त्यांनी भाषण दिले.

जगातील मुसलमानांनी शत्रूच्याविरोधात एकत्र व्हावे. तसेच इस्त्रायलचा मुकाबला करण्यासाठी अरब देशांनीही एकत्र यायला हवे, कारण इस्त्रायलचा खात्मा करणे गरजेचे आहे. इस्त्रायलवर मंगळवारी झालेला क्षेपणास्त्र हल्ला ही छोटी शिक्षा होती, गरज पडल्यास आणखी हल्ला करू. इस्त्रायल कधीही हमास किंवा हिजबुल्लाचा पराभव करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

खामेनी म्हणाले, “अफगाणिस्तानपासून येमेनपर्यंत आणि इराणपासून गाझा, लेबनॉनपर्यंत सर्व मुस्लीम देशांना कंबर कसावी लागणार आहे. इराण हिजबुल्लाबरोबर उभा आहे. इस्रायलला इराणने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलने आमच्यावर हल्ला केला तर इराणदेखील स्वस्थ बसणार नाही. पॅलेस्टाइन, लेबनॉन व इराणमधील इस्रायलच्या कारवायांमुळे आम्ही दुःखी आहोत, मात्र आम्ही पराभूत झालेलो नाही”.

इस्त्रायलच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ - इराण

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी बैरुत येथे लेबॅनॉनच्या संसदेचे अध्यक्ष नबीह बेरी यांची भेट घेतली. त्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची म्हणाले की, इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ. यंदाच्या एप्रिलमध्ये इराण व सीरियात इराणी दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर इराणने इस्त्रायलवर केलेला हल्ला स्वसंरक्षणाचा होता.

इस्त्रायलचा लेबॅनॉनवर तिसऱ्यांदा हल्ला

इस्त्रायलने लेबनॉनवर शुक्रवारी तिसऱ्यांदा हवाई हल्ला केला आहे. इस्त्रायलच्या लढाऊ विमानांनी तराया शहरावर बॉम्बफेक केली.

ब्रिटन व इटलीची लेबनॉनला आर्थिक मदत

ब्रिटन व इटलीने लेबनॉनला आर्थिक मदत केली आहे. ब्रिटनने लेबनॉनला १० दशलक्ष पाऊंडची तर इटलीने १७ दशलक्ष युरोची मदत केली आहे.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी