Photo : X 
आंतरराष्ट्रीय

जिनपिंग यांच्या गुप्त पत्रामुळे भारत-चीन कोंडी फुटली; मोदी चीनच्या दौऱ्यासाठी झाले तयार

अमेरिका-भारत करारांमुळे चीनच्या हितांना होऊ शकणाऱ्या धोक्याबद्दल चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली, असा दावा 'ब्लूमबर्ग' च्या अहवालात केला.

Swapnil S

नवी दिल्ली: अमेरिका-भारत करारांमुळे चीनच्या हितांना होऊ शकणाऱ्या धोक्याबद्दल चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली, असा दावा 'ब्लूमबर्ग' च्या अहवालात केला.

मार्चमध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चीनविरुद्धचा व्यापारयुद्ध अधिक आक्रमक करत होते, त्याच काळात चीनने भारताशी गुपचूप संपर्क साधण्यास सुरुवात केली होती.

पत्राद्वारे शी जिनपिंग यांनी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या शक्यता तपासल्या होत्या. यानंतर भारत-चीन संबंधांत सुधारणा होऊ लागली. काही महिन्यांनंतर मोदींच्या चीन भेटीचा कार्यक्रम आखण्यात आला.

एका भारतीय अधिकाऱ्याच्या हवाल्याने अहवालात म्हटले की, हे पत्र पंतप्रधान मोदींपर्यंतही पोहोचवण्यात आले होते, जेणेकरून ते संबंध सुधारण्याची खरी शक्यता किती आहे, याचा अंदाज घेऊ शकतील.

पत्रात चीनने विशेषतः ही चिंता व्यक्त केली होती की, भारत अमेरिका यांच्यात होणारा कोणताही करार चीनच्या हितांना हानी पोहोचवू शकतो. त्यात चीनच्या वतीने संबंध सुधारण्याचे नेतृत्व एका प्रांतीय अधिकाऱ्याने करेल, असेही नमूद करण्यात आले होते.

दोन निर्णयांमुळे वाढली भारताची नाराजी

ब्लूमबर्गच्या मते, जूनपर्यंत भारताने जिनपिंग यांच्या पत्राला कोणताही ठोस प्रतिसाद दिला नव्हता. पण त्यानंतर भारत- अमेरिका व्यापार चर्चा वादात अडकली आणि परिस्थिती बदलली.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या हवाल्याने 'ब्लूमबर्ग' ने म्हटले की, भारत दोन मुद्द्यांवर विशेषतः नाराज होता. पहिले म्हणजे, ट्रम्प यांनी दावा केला की, भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणला, ज्याला भारताने पूर्णपणे फेटाळून लावले.

भारताची भूमिका कमकुवत करण्याच्या प्रयत्नांमुळे मोदी सरकार आधीच नाराज होते. त्यानंतर अमेरिकेने भारतावर ५०% टॅरिफ लावला.

या दोन निर्णयांनी भारत-अमेरिका संबंधांत असंतोष आणि तणाव वाढवला. त्यानंतर भारताने जूनमध्ये चीनकडून आलेल्या पुढाकाराला गंभीरतेने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.

७वर्षांनंतर चीन दौऱ्यावर मोदी

ऑगस्टपर्यंत भारत आणि चीन यांनी २०२० च्या गलवान संघर्षानंतर सीमा विवाद सोडवण्याच्या प्रयत्नांना दुप्पट गती देण्याचे ठरवले. आणि आता पंतप्रधान मोदी सात वर्षांनी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तथापि, अहवालात नमूद केले की, ट्रम्प यांच्या टैरिफपूर्वीच भारत आणि चीन गंभीर चर्चेत गुंतलेले होते. गेल्या वर्षी दोन्ही देशांनी लडाखमधील तणाव काही प्रमाणात सोडवण्यासाठी एक करार केला होता. ह्याच कराराने मोदी आणि शी जिनपिंग यांच्या पहिल्या प्रत्यक्ष भेटीचा मार्ग मोकळा केला. आता पंतप्रधान मोदी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेसाठी चीनला जाणार आहेत. तिथे त्यांची भेट जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी होणार आहे. या भेटीकडे अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून आहे, कारण ती त्याच्यासाठी एक धोरणात्मक चिंतेचा विषय ठरू शकते.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती