Handout/ISPR/AFP
आंतरराष्ट्रीय

होय, कारगिल युद्ध आम्हीच घडवले, पाक लष्कर प्रमुखांची कबुली

कारगिल युध्दाला तब्बल २ दशके उलटल्यावर पहिल्यांदाचा कारगिलच्या युध्दात पाकिस्तानच्या लष्कराचा सहभाग असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी आज दिली.

Swapnil S

कराची : कारगिल युध्दाला तब्बल २ दशके उलटल्यावर पहिल्यांदाचा कारगिलच्या युध्दात पाकिस्तानच्या लष्कराचा सहभाग असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी आज दिली. पाकिस्तानातली जनता बहादूर आहे़ या जनतेला स्वातंत्र्याचे महत्त्व चांगलेच ठाऊक आहे आणि स्वातंत्र्यासाठी किंमत कशी मोजावी लागते हेही पाकिस्तानच्या जनतेला माहीत आहे, असे सांगून १९९९ च्या कारगिल युध्दात हजारोंच्या संख्येत पाकिस्तानी जवानांनी देश व इस्लामसाठी आपल्या आपल्या प्राणांचे बलिदान दिल्याचे सांगितले.

शहिद दिनानिमित्त युध्दात मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात जनरल मुनीर यांनी ही कबुली दिली. त्यांनी केलेल्या विधानामुळे पाकिस्तान सरकारचा मुखवटा फाटून पाकिस्तान सरकार पुर्णपणे उघडे पडले आहे. आतापर्यंत पाकिस्तान सरकारची अधिकृत भूमिका जनरल मुनीर यांच्या आजच्या विधानाच्या अगदी उलट होती. कारगिल युध्दाशी आमचा काही एक संबंध नसून काश्मीरमधल्याच काश्मीरी अतिरेक्यांनी, ज्यांना पाक मुजाहिदीन असे संबोधतो, हे युध्द घडवून आणले अशी भूमिका पाक जगापुढे मांडत आला होता़ पण मुनीर यांच्या विधानाने कारगिल युध्दात पाक लष्काराच्या सैनिकांना जीव गमवावे लागले असल्याची थेट कबुलीच दिली.

मुनीर आपल्या भाषणात म्हणाले की, पाक लष्कराने नेहमी आपल्या जीवाचे बलिदान देऊन स्वातंत्र्याची किंमत मोजली आहे. मग ते १९४८, १९६५, १९७१ चे युध्द असो की १९९९ कारगिल युध्द असो. देश आणि इस्लामसाठी आपल्या जवानांनी बलिदान केले आहे.

कारगिल युध्दाच्यात भरतीय जवानांनी जीवाची बाजी लावत शत्रुला जसासतसे उत्तर देत विजय मिळवला होता.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक