Freepik
लाईफस्टाईल

Eye Care: २०३० पर्यंत भारतात प्रत्येक ३ शहरी बालकांमागे एकाला डोळ्यांचा 'हा' आजार होण्याची शक्यता!

Tejashree Gaikwad

Myopia: भारतातील ५-१५ या वयोगटातील सर्व शहरी मुलांपैकी एक तृतीयांश मुलांना २०२३० पर्यंत मायोपियाचा त्रास होण्याची शक्यता असल्याचे मुंबईतील डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या नेत्रचिकित्सकांनी सध्या सुरू असलेल्या मायोपिया जागरूकता सप्ताहात सांगितले आहे. तर सन २०५० पर्यंत, देशातील दर दोन मुलांपैकी एक मूल मायोपिक असेल, असे भाकितही त्यांनी चालू असलेल्या ट्रेंडच्या आधारे केले आहे. सन १९९९ ते २०१९ या २० वर्षांच्या कालावधीत, शहरी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण भारतात अनुक्रमे ४.४४% वरून २१.१५% पर्यंत तिप्पट झाले आहे.

काय म्हणाले डॉक्टर?

डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल, कल्याण, ठाणे येथील मोतीबिंदू शल्यचिकित्सक डॉ. स्मित एम बावरिया म्हणाले " गेल्या काही वर्षांपासून शहरी मुलांमध्ये मायोपियाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आपण पाहत आहोत. २० वर्षांखालील सुमारे १२०,००० मायोपिक रुग्ण दरवर्षी भारतभर डॉ. अगरवाल्स यांच्या नेत्र रुग्णालयात भेट देतात. ५ ते १५ वर्षे वयोगटातील शहरी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण १९९९ मध्ये ४.४% वरून २०१९ मध्ये २१.१% पर्यंत वाढले. दरवर्षी ०.८% च्या प्रमाणानुसार आधारित आमचे अंदाज, शहरी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण वाढेल असे सूचित करतात. २०३० मध्ये ३१.८९%, २०४० मध्ये ४०% आणि २०५० मध्ये ४८.१%. याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक दोन मुलांपैकी एक बालक येत्या २५ वर्षात मायोपियाने ग्रस्त असेल, सध्याच्या चारपैकी एकाला मायोपिया असण्याच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण जास्त आहे.”

१,००० मुलांचे सर्वेक्षण

डॉ. स्मित एम. बावरिया पुढे म्हणाले "रुग्णांचा वयोगटही आता गेल्या काही वर्षांमध्ये बदलताना दिसून येतोय. डोळ्यांच्या तपासणीसाठी लहान मुलं वारंवार येत असल्याचं दिसत आहे. त्यातील अधिकाधिक मुलांना मायोपिया असल्याचं दिसत आहे. आम्ही सध्या ५ ते १७ वयोगटातील शालेय मुलांमध्ये मायोपिया असल्याची अनेक उदाहरणं पाहात आहोत. २०१७ मध्ये, मुंबईतील शहरी झोपडपट्टी भागातील ३-१५ वयोगटातील १,००० मुलांचे सर्वेक्षण, २०० मुलांना मायोपिया असल्याचे आढळून आले.”

काय आहे कारणे?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बैठी जीवनशैली, दीर्घकाळ स्क्रीनचा वापर आणि कमी बाह्य क्रियाकलाप यामुळे मुलांमध्ये मायोपियाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होते आहे. ते म्हणाले "या वाढत्या समस्येची मूळ कारणे बहुआयामी आहेत. स्क्रीनवरील अधिक वेळ मुलांच्या डोळे, रेटिना आणि मेंदूला उत्तेजित करतो. ज्यामुळे बुबुळाच्या जलद वाढीमुळे मायोपिक बदलांना गती मिळते. याव्यतिरिक्त, घराबाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशात फिरणे नसल्याने मुलांना डोळ्यांच्या निरोगी विकासासाठी आवश्यक असलेला नैसर्गिक प्रकाश मिळू शकत नाही.”

डॉ. स्मित एम. बावरिया पुढे म्हणालेः "मुलांमध्ये मायोपियाची लक्षणे ओळखून वैद्यकीयदृष्ट्या झटपट हालचाल करणे महत्वाचे आहे. लक्षणांमध्ये अस्पष्ट दृष्टी, दूरच्या वस्तू पाहण्यात अडचण, डोळ्यांवरील ताण, डोकेदुखी आणि थकवा विशेषतः दीर्घकाळ स्क्रीन वापरल्यानंतर यांचा समावेश होतो. ही स्थिती बरी होऊ शकत नसली तरी चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या मदतीने फरक पडू शकतो. वयाच्या १९ वर्षांनंतर लेझर दृष्टी सुधारणा उपचार देखील निवडला जाऊ शकतो. परंतु डोळ्यांची नियमित तपासणी करणे, स्क्रीनवरील वेळेचा समतोल राखण्यासाठी मुलांना घराबाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशात क्रियाकलापांसाठी प्रोत्साहित करणे आणि मायोपियाची पुढील प्रगती मंदावण्यासाठी एट्रोपीन आय ड्रॉप्स किंवा मायोपिया कंट्रोल ग्लासेस सारख्या वैद्यकीय हस्तक्षेपांचा विचार करणे महत्वाचे आहे.”

डॉक्टरांनी सांगितले की मुलांमधील मायोपियाचा त्वरित शोध लावणे आणि त्यावर उपचार करणे महत्त्वाचे ठरते. कारण कोणत्याही विलंबामुळे अँब्लियोपिया (लेझी आय) विकार होऊ शकतो.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस