Freepik
लाईफस्टाईल

World Bicycle Day 2024: रोज सकाळी फक्त ३० मिनिटे चालवा सायकल, WHO ने सांगितले जबरदस्त फायदे

30 Minutes Cycling Benefits: दरवर्षी ३ जून रोजी आंतरराष्ट्रीय बायसायकल दिवस साजरा केला जातो. याच निमित्ताने सायकलिंगचे करण्याचे फायदे जाणून घ्या.

Tejashree Gaikwad

What Are The Cycling health Benefits: जगभरात जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. सायकलिंगद्वारे आरोग्याविषयी जनजागृती करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. दररोज सायकल चालवल्याने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते आणि आजारांचा धोका कमी होतो. सायकलिंग हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या आपल्याला सक्रिय ठेवतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते दररोज फक्त ३० मिनिटे सायकल चालवल्यास तुम्हाला अगणित फायदे मिळतात. यातील असे ३ फायदे आहेत जे तुम्हाला अधिक हेल्दी होण्यास मदत करतील. चला ददरोज सायकलिंग करायचे फायदे जाणून घेऊयात.

वजन कमी होण्यास फायदेशीर

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आवर्जून दररोज ३० मिनिटे सायकलिंग करावी. हा वजन कमी करण्यासाथीचा सर्वात सोपा उपाय आहे. सुरवातीला हळू हळू सायकल चालवा. यानंतर तुम्ही वेग वाढवू शकता किंवा कमी वेगाने सायकल चालवू शकता.

पाय मजबूत होतील

सायकलिंग केल्याने तुमचे पाय मजबूत होतील. सायकल चालवल्याने तुमच्या खालच्या शरीराचे एकूण कार्य सुधारते. यामुळे तुमच्या सांध्यावर जास्त ताण न पडता तुमच्या पायाचे स्नायू मजबूत होतात.

कोलेस्टेरॉल आरोग्य राखले जाईल

सायकलिंगच्या तुम्हाला तुमची कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करू शकतात. रोज सायकल चालवल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.

याशिवाय सायकलिंगमुळे तणाव, नैराश्य किंवा चिंता या भावना कमी होऊ शकतात. यामुळे तुमची एकाग्रता सुधारते.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video