Akshaya Tritiya 2026 : पुरीसोबत परफेक्ट! गोड-सुगंधी आमरस; घरच्या घरी बनवा सोपी रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

Akshaya Tritiya 2026 : पुरीसोबत परफेक्ट! गोड-सुगंधी आमरस; घरच्या घरी बनवा सोपी रेसिपी

गोड, सुगंधी आणि चविष्ट आमरस पुरीसोबत खाण्याची मजा काही औरच असते. घरच्या घरी सहज तयार होणारी ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा.

किशोरी घायवट-उबाळे

अक्षय्य तृतीयानिमित्त घराघरांत गोडधोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचा हंगाम सुरू असल्याने 'आमरस' हा पदार्थ खास आकर्षण ठरतो. गोड, सुगंधी आणि चविष्ट आमरस पुरीसोबत खाण्याची मजा काही औरच असते. घरच्या घरी सहज तयार होणारी ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा.

साहित्य :

  • मध्यम पिकलेले आंबे - ४

  • वेलदोडे - २० ते २५

  • साखर - १/२ टेबलस्पून

  • जायफळ पूड - चिमूटभर

  • पिठीसाखर - १ टेबलस्पून

कृती :

सर्वप्रथम वेलदोडे आणि साखर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हे मिश्रण चाळणीतून गाळून हवाबंद डब्यात साठवून ठेवा. आंबे सर्व बाजूंनी हलके दाबून त्यातील गर एका भांड्यात काढा. आंब्याचा बाठा आणि साल वेगळी करून चांगले मॅश करा. त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली अर्धा टीस्पून वेलदोडा पूड, साखर, जायफळ पूड, आणि पिठीसाखर घाला. सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. तयार आमरस वाट्यांमध्ये काढून गरम पुरीसोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • आमरस अधिक गोड हवा असल्यास साखरेचे प्रमाण वाढवू शकता.

  • अधिक मऊ टेक्स्चर साठी मिक्सरमध्ये हलकं फिरवू शकता.

  • थंडगार आमरस खायचा असेल तर फ्रिजमध्ये ३० मिनिटे ठेवा.

  • केशर घातल्यास चव आणि रंग दोन्ही वाढतात.

  • हापूस/अल्फोन्सो आंबा वापरल्यास आमरस टेस्टी होतो.

अक्षय्य तृतीयेच्या सणाला घरच्या घरी तयार केलेला आमरस हा जेवणाची शोभा वाढवतो. सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...