लाईफस्टाईल

ABC ज्यूस - निखळ त्वचेसाठी सोपा फॉर्म्युला

प्रदूषण, अवेळी जेवण, फास्ट फूड यामुळे पोट चांगलंच बिघडतं. पोट बिघडलं की त्याचा परिणाम त्वचेवर होतो. त्वचा रुक्ष होत जाते. मग, आपण उपाय शोधू लागतो. पण, हा उपाय आपल्या आहारात आणि पोटात लपलेला आहे.

नेहा जाधव - तांबे

प्रदूषण, अवेळी जेवण, फास्ट फूड यामुळे पोट चांगलंच बिघडतं. पोट बिघडलं की त्याचा परिणाम त्वचेवर होतो. त्वचा रुक्ष होत जाते. मग, आपण उपाय शोधू लागतो. पण, हा उपाय आपल्या आहारात आणि पोटात लपलेला आहे. आपल्याला निरोगी आणि तेजस्वी त्वचा हवी असेल तर ABC ज्यूस हा सर्वोत्तम पर्याय आहे. Apple+Beetroot+Carrot या तीन घटकांनी बनलेला हा ज्यूस त्वचेसाठी अमूल्य ठरतो. त्यातील पोषणतत्त्वं शरीराला डिटॉक्स करून त्वचेचा नैसर्गिक तजेलपणा वाढवतात. कसा ते जाणून घेऊया.

Apple - आरोग्याचा राजा

Apple मध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स भरपूर असतात. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि सुरकुत्या व डाग कमी होतात. त्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि त्वचा उजळ बनते.

Beetroot - रक्तशुद्धीचा राजा

Beetroot मध्ये असलेल्या आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड व अँटीऑक्सिडंट्समुळे रक्त शुद्ध होते. डिटॉक्स इफेक्टमुळे त्वचा ताजीतवानी व नितळ होते. त्वचेची नैसर्गिक चमक वाढते.

Carrot - नैसर्गिक सनस्क्रीन

Carrot हे बीटा-कॅरोटीन व व्हिटॅमिन A चे उत्तम स्रोत आहे. Carrot त्वचेला पोषण देतो, सूर्यप्रकाशाच्या नुकसानीपासून संरक्षण करतो. त्वचा स्वच्छ, उजळ आणि कोमल बनवतो.

ABC ज्यूसचे प्रमुख फायदे

  • त्वचेला निखळ आणि चमक देते.

  • त्वचेची कोरडी होत नाही.

  • रक्तशुद्धी करून शरीर डिटॉक्स करतो

  • वृद्धत्वाची प्रक्रिया संथ करतो

  • नैसर्गिक स्किन रिन्युअलला मदत करतो

ABC ज्यूस कसा तयार कराल?

साहित्य -

  • १ मध्यम सफरचंद

  • १ लहान बीट

  • २ गाजर

  • १/२ कप पाणी (किंवा बर्फ)

  • ऐच्छिक - मध, पुदिना किंवा लिंबू रस

कृती -

  • १. सर्व फळे स्वच्छ धुवून तुकडे करा.

  • २. मिक्सरमध्ये पाणी/बर्फ टाकून ब्लेंड करा.

  • ३. छान गाळून घ्या.

  • ४. चवीनुसार मध/लिंबू घालून सर्व्ह करा.

ABC ज्यूस हा त्वचेचा नैसर्गिक सौंदर्य फॉर्म्युला आहे. त्याचे नियमित सेवन केल्यास त्वचा तेजस्वी, ताजीतवानी आणि निरोगी राहते. रोजच्या आहारात याचा समावेश करून तुमचं आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही सुधारवा.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती