लाईफस्टाईल

स्वयंपाक चविष्ट करण्यासाठी भाजीत 'हे' पदार्थ घाला

Rutuja Karpe

बऱ्याचं लोकांनी काही ठरलेल्याच भाज्या खाण्याची आवड असते. त्यांना बर्‍याच भाज्यांची चव आवडत नाही. त्यामुळे त्यांना त्याच त्याच भाज्या खाऊन देखील कंटाळा येतो. अशा वेळी उत्तम स्वयंपाक येणाऱ्या आणि हाताला सुंदर चव असणाऱ्या गृहिणींनाही कळत नाही की घरातल्यांच्या आहारात कोणत्या भाज्या कराव्यात. पण घरातल्यांना न आवडणारी एखादी भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो. त्यामुळे त्या पद्धती वापरून आपण घरातल्यांना केवळ निरोगीच नाही तर स्वादिष्ट भाज्या खायला घालू शकतो. निरनिराळ्या प्रकारचे हर्ब्स, मसाले आणि वाटणाचे प्रकार वापरून आपण आपला रोजचा स्वयंपाक चविष्ट बनवू शकतो.

काळी मिरी

आपल्या जेवणात आपण तिखटपणा आणण्यासाठी लाल मिरची किंवा हिरव्या मिरच्यांचा वापर करतो परंतु काळी मिरी देखील तिखटपणासाठी आपण वापरू शकतो. काळी मिरी ही पदार्थाची चव वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच काळी मिरी खाण्याचे आरोग्यालाही फायदे होतात. तुम्ही काळी मिरी वापरली की तुम्हाला जाणवेल की भाजीची चव थोडी बदलून चांगली झाली आहे. पण ज्या प्रमाणात तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट वापरता त्याप्रमाणे काळी मिरी जास्त वापरू नका.

कोथिंबीर

बऱ्याच लोकांचा असा समज असतो की कोथिंबिरीला काही फार चव नसते आणि तिचा वापर केवळ वरून सजावटीसाठी किंवा वाटणात किंवा चटणीत करतात. ती भाजीत घातली नाही तरी फारसा फरक पडत नाही. पण तसे नाही. थोडीशी चिरलेली ताजी कोथिंबीर तुमच्या भाजीची चव खूप वाढवू शकते.

लिंबू

भाजी शिजल्यानंतर लगेच त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकले तर त्याने भाजीची चव वाढते. ज्या भाज्यांमध्ये टोमॅटो जास्त वापरला नसेल किंवा ज्यामध्ये दुधाची ग्रेव्ही नसेल अशा भाज्यांमध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस घालू शकता. यामुळे भाजीचा सुगंध आणि चव दोन्ही वाढेल.

लवंग व वेलची

लवंग व वेलची भाजीत फोडणीत घातले तर भाजीची चव बदलते व भाजीची चव वाढते. पण जास्त प्रमाणात वेलची घालू नका कारण ती कधी कधी चव खराब करते. तसेच वेलची सालीसकट न घालता ती सोलून तिचे दाणे भाजीत घाला म्हणजे भाजीला छान चव येईल.

नारळाचे दूध

नारळाचे दूध ग्रेव्ही असलेल्या सर्व प्रकारच्या भाज्यांची चव उत्कृष्ट बनवण्यास मदत करते. तसेच जर भाजीचा रस्सा खूप पातळ झाला असेल तर भाजी घट्ट होण्यासाठीही ते उपयुक्त ठरू शकते. तुम्ही भाजीत कडीपत्ता घालत असाल तर त्यासोबत थोडेसे नारळाचे दूध देखील घाला म्हणजे घरची माणसे बोटे चाटत भाजी संपवतील.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस