लाईफस्टाईल

ऐन तारुण्यात केस पांढरे झाले? आवळ्यापासून घरीच बनवा नॅचरल हेअर डाय

बाजारात मिळणाऱ्या केमिकल हेअर डायमुळे केसांना नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकजण आता नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

तरुण वयात केस पांढरे होणे ही आज अनेकांची समस्या बनली आहे. ताणतणाव, बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि रासायनिक उत्पादनांचा अतिवापर यामुळे केस लवकर पांढरे होतात. बाजारात मिळणाऱ्या केमिकल हेअर डायमुळे केसांना नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकजण आता नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत.

या समस्येवर आवळा हा एक प्रभावी आणि पारंपरिक उपाय मानला जातो. आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे केसांच्या मुळांना पोषण देतात आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यास मदत करतात. विशेष म्हणजे, आवळ्याचा वापर करून घरीच नॅचरल हेअर डाय सहज बनवता येतो.

आवळ्यापासून नॅचरल हेअर डाय कसा तयार करायचा?

  • आवळा पावडर आणि मेहंदी पावडर समप्रमाणात घ्या.

  • त्यात थोडे चहा पावडर किंवा कॉफी उकळलेले पाणी मिसळा.

  • मिश्रण घट्ट पेस्टसारखे करून २ ते ३ तास भिजत ठेवा.

  • ही पेस्ट केसांवर लावून आणि १ ते २ तास तसेच ठेवा.

  • नंतर थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवा.

या उपायामुळे केसांना नैसर्गिक रंग मिळतो, तसेच केस अधिक मजबूत आणि चमकदार दिसतात. या पेस्टचा नियमित वापर केला तर पांढऱ्या केसांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

आजचे राशिभविष्य, ३० जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हिवाळ्यात खा पौष्टिक नाचणीचे पराठे; जाणून घ्या सोपी रेसिपी

कांदे पोहे खाऊन कंटाळलात ? ट्राय करा पोह्यांचे ७ भन्नाट प्रकार जे नाश्त्याची चवच बदलतील

ट्रेंडी लूकसोबत उंचही दिसायचंय? तर 'या' फॅशन टिप्स नक्की फॉलो करा

राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार मतदान