आपले केस काळे, घनदाट असावे असे कुणाला वाटत नाही. मात्र, धावपळीचे जीवन, कामाचा ताण, अयोग्य आहार अशा अनेक कारणांमुळे केस गळतात. मग, अनेकदा सोशल मीडियावर रील्स पाहून घरगुती उपाय केले जाते. मात्र, तरीही समस्या सुटत नाही. केस गळणे थांबत नाहीत. तुमच्या बाबतीतही असे घडत असल्यास तुम्हाला तुम्ही पुढील चुका करतात का याकडे लक्ष द्यावे लागेल.
केस धुण्यासाठी अगदी कडक पाणी वापरता का?
केस कधीही कोमट पाण्याने धुवावे. मात्र, काही लोकांना थंडी सहन होत नसल्याने अनेकदा खूप जास्त गरम किंवा कडक पाण्याने केस धुतले जातात. खूप गरम पाण्याने केस धुतल्याने केस मोठ्या प्रमाणात गळतात.
केस गळत असल्यास तेल लावू नये
केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर खूप जास्त तेल लावू नये. कारण केसांची मूळं नाजूक झालेली असतात. अशा वेळी खूप जास्त तेल लावल्याने केस आणखी गळायला लागतात.
केस गळती कमी होईपर्यंत 'या' गोष्टी कटाक्षाने टाळा
वाफ घेणे
केसांना वाफ घेणे निश्चितच चांगले असते. मात्र, जेव्हा तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर अशा वेळी वाफ घेणे योग्य राहत नाही.
हेअरपॅक लावणे
केसांच्या मुळे कमजोर झाल्याने हेअर पॅक केसांना सहन होत नाही. त्यामुळे केस गळत असताना हेअर पॅक लावणे फायद्याचे नाही.
हेअर ड्रायर वापरणे
केस गळत असताना हेअर ड्रायरचा वापर करू नये. यामुळे केस गळतीचे प्रमाण आणखी वाढते.
मसाज करू नये
केसांची मुळे नाजूक झाल्याने अशा वेळी केसांना तेलाने किंवा अन्य कोणत्याही प्रकार मसाज करू नये. यामुळे नुकसान जास्त होऊ शकते.
शाम्पूचा अतिवापर टाळणे
केस गळत असल्यास शाम्पूचा अतिवापर टाळायला हवे. त्याऐवजी शिकाकाई, आवळा, रिठासारख्या नैसर्गिक घटकांनी केस स्वच्छ करावे.
केमिकलयुक्त मेहंदी किंवा हेअर कलर लावू नये
केस गळत असल्यास केमिकलयुक्त मेहंदी किंवा हेअर कलर लावू नये. यामुळे केसांना अधिक नुकसान पोहोचू शकते.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत
केस गळत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत. बाजारातील कोणतेही औषध किंवा तेल मनानेच वापरू नये.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)