Freepik
लाईफस्टाईल

Natural Anti Aging Drink : पन्नाशीतही दिसाल तरुण; ६ सुपरफूडपासून घरच्या घरी बनवा 'हे' पेय; करा नियमित सेवन आणि पाहा जादू

अगदी घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांनी ६ सुपरफूडपासून एक खास पेय बनवून त्याचा आहारात समावेश केल्यास तुमच्या चेहऱ्यावर तुमचे वय अजिबात दिसणार नाही. जाणून घ्या हा आवळ्यापासून हा खास पेय पदार्थ कसा बनवतात आणि काय होतात त्याचे फायदे?

Kkhushi Niramish

वय वाढते तसे त्याच्या खुणा चेहरा, केस यांच्यावर दिसू लागतात. मात्र, तुम्ही त्यांना लपवू शकता. अगदी पन्नाशीत पोहोचला तरी तुम्ही तरुण दिसू शकता. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची महागडी ट्रिटमेंट घेण्याची आवश्यकता नसते. अगदी घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांनी ६ सुपरफूडपासून एक खास पेय बनवून त्याचा आहारात समावेश केल्यास तुमच्या चेहऱ्यावर तुमचे वय अजिबात दिसणार नाही. जाणून घ्या हा आवळ्यापासून हा खास पेय पदार्थ कसा बनवतात आणि काय होतात त्याचे फायदे?

हे पेय ६ नैसर्गिक सुपरफूडपासून बनवले जाते. हे एक प्रकारचे टॉनिक आहे जे तुमच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या घालवते. तुमचा रंग उजळतो. केस गळत नाही तसेच ते काळे राहतात. यामुळे तुम्ही पन्नाशीतही अगदी तिशीतील तरुणासारखे दिसतात.

कोणत्या पदार्थापासून बनवतात 'हे' पेय?

हे पेय ६ सुपरफूडपासून बनवले जाते. यामध्ये आवळा, आलं, पुदीना, लिंबू, मध आणि काळे मीठ यांचा समावेश होतो.

वैशिष्ट्ये

आवळा हे व्हिटॅमिन सी चे मोठे भंडार आहे. जे कोलेजन वाढवते त्यामुळे त्वचा टाईट राहते आणि अधिक तरुण दिसते.

आलं

आल्यात वृद्धत्वाविरोधी एंजाइम मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे रक्ताभिसरण वाढून त्वचा चमकदार होते.

पुदिना

पुदिना शरीरातील विषारी घटकद्रव्य काढून टाकते. यामुळे त्वचेवर पिंपल्स येत नाहीत. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. मुरुमांपासूनही बचाव होतो.

लिंबू

त्वचा आणि केसांसाठी लिंबू हे अतिशय उपयुक्त आहे. लिंबू देखील शरीराला विषमुक्त करण्याचे काम करतो. त्यामुळे बॉडी डिटॉक्स होऊन त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते.

मध

मधाला आयुर्वेदाने अत्यंत उपयुक्त म्हटले आहे. हा त्वचेसाठी एक मोठे वरदान आहे. हे एक नैसर्गिक मॉइश्चरायजर आहे. यामुळे त्वचा मऊ होते.

काळे मीठ

काळ्या मीठामुळे पचनक्रिया सुधारते. पोटफुगी कमी होते. त्यामुळे तुमचे फिगर आकर्षक राहते.

जाणून घ्या साहित्य आणि बनवण्याची योग्य पद्धत

१ टेबलस्पून आवळा रस (किंवा १ लहान चिरलेला आवळा)

१/२ चमचा आल्याचा रस

५-६ पुदिन्याची पाने (ताजी)

१/२ लिंबाचा रस

१ चमचा मध

एक चिमूटभर काळे मीठ

१ ग्लास कोमट पाणी

बनवण्याची पद्धत

सर्व पदार्थ मिक्सरमध्ये घाला आणि एकत्रित बारीक करून घ्या. त्यानंतर गाळणीने गाळून घ्या. रस तयार आहे. दररोज सकाळी हा रस रिकाम्या पोटी प्या.

याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. मात्र, ज्या लोकांना आवळ्याची अॅलर्जी आहे तसेच गर्भवती महिला यांनी हे पेय टाळावे किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने प्यावे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा