Freepik
लाईफस्टाईल

पोटावरील चरबी झटपट होईल कमी; 'या' पाच स्टेप्स फॉलो करा, सात दिवसात जाणवेल फरक

तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि पोटावरील वाढलेली चरबी तुम्हाला कमी करायची असेल तर इथे आम्ही पाच स्टेप्स सांगत आहोत. या पाच स्टेप्सनुसार आवश्यक ते बदल केल्यास निश्चितच तुम्हला फरक जाणवेल.

Kkhushi Niramish

वजन वाढणे, लठ्ठपणा, पोट सुटणे, पोटावरील वाढलेली चरबी या समस्या खूपच सामान्य झाल्या आहेत. आज प्रत्येक जण वाढलेल्या वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतो. एवढे करूनही वजन काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या मनासारखे कपडे देखील घालता येत नाही. तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि पोटावरील वाढलेली चरबी तुम्हाला कमी करायची असेल तर इथे आम्ही पाच स्टेप्स सांगत आहोत. या पाच स्टेप्सनुसार आवश्यक ते बदल केल्यास निश्चितच तुम्हला फरक जाणवेल.

क्रंच व्यायाम

क्रंचा हा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उत्तम व्यायाम प्रकार मानला जातो. यामध्ये तुम्हाला गुडघे वर उचलून गुडघ्याखालील पाय सरळ ठेवायचे असतात. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या पाठीमागे नेऊन डोके, मान, आणि पाठीचा वरील भाग उचलायचा आणि पुन्हा खाली न्यायचा असतो. ही क्रिया पुन्हा पुन्हा करायची असते. यामुळे पोटावर ताण येऊन चरबी कमी व्हायला मदत होते.

जीवनसत्त्व 'क' युक्त आहार

पोटाची चरबी झटपट कमी करण्यासाठी आहार संतुलन आवश्यक असून आहारात जीवनसत्त्व क युक्त पदार्थांचा समावेश करावा. जसे लिंबू, द्राक्ष, बोर आणि संत्रं यांचा आहारात समावेश करावा. जीवनसत्त्व क मुळे फॅट्स लवकर बर्न होतात आणि शरीराला शेप मिळतो. याव्यतिरिक्त गाजर, पत्ता कोबी, ब्रोकोली, सफरचंद आणि टरबूज इत्यादी शरीरातून पाणी आणि वसा शोषतात. हे सर्व करताना अधिक कॅलरी असणाऱ्या अन्न पदार्थ टाळायचा प्रयत्न करा.

झोप

केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर एकूणच उत्तम आरोग्यासाठी झोप ही अतिशय महत्त्वाची आहे. सामान्यपणे ६ ते ७ तास झोप व्हायला हवी. यापेक्षा कमी झोप आपल्या हार्मोन्सला फॅट्स साठवण्यासाठी प्रेरित करते. भरपूर झोप घेतल्याने सकाळी फ्रेश आणि हलके जाणवेल.

ताण कमी करण्याचा प्रयत्न

वजन आणि पोटाची चरबी वाढण्यसााठी ताण हे एक मुख्य कारण आहे. तणाव हल्लीच्या लाइफस्टाइलची देणगी आहे. ताण वाढल्यामुळे भूख लागते आणि अती खाण्यात येतं. आणि या उलट ताणामुळे शरीराची चयापचय प्रक्रिया हळू होते. परिणामस्वरूप लठ्ठपणा वाढतो. ताण कमी करण्यासाठी नियमितपणे प्राणायम आणि ध्यान करावे. याचा उत्तम फायदा होतो. याशिवाय नातेवाईकांसोबत संवाद, मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाणे, आनंददायक खेळ खेळणे यामुळे देखील ताण कमी होतो.

पोटाची चरबी कमी करणारे आसन

याशिवाय नियमितपणे योगासन केल्याने देखील पोटाची चरबी झटपट कमी होते. सुटलेले पोट कमी करण्यासाठी भूजंगासन, पश्चिमोत्तानासन, धनुरासन इत्यादी आसने नियमित करावी. यामुळे पोटाची चरबी झटपट कमी होते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर

राक्षसी बहुमतापेक्षा मोठी जनशक्ती

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा