प्रातिनिधिक छायाचित्र FreePik
लाईफस्टाईल

Strengthens muscles : हाडांना मिळेल बळकटी, 'या' सात पदार्थांचा करा आहारात समावेश

उन्हाळ्यात आपल्या आहारात बदल करून थंडीत कमकुवत झालेली हाडे पुन्हा बळकट करू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात थोडासा बदल करण्याची आवश्यकता आहे. हाडांची मजबुती कॅल्शिअम आणि मिनरल्सपासून असते. त्यामुळे हाडांना बळकट करण्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घ्यायला हवा.

Kkhushi Niramish

थंडी सरली आहे. उन्हाळा सुरू होत आहे. थंडीमध्ये अनेकांना सांधेदुखीचा तीव्र त्रास जाणवतो. हाडे दुखत असतात. मात्र तुम्ही उन्हाळ्यात आपल्या आहारात बदल करून थंडीत कमकुवत झालेली हाडे पुन्हा बळकट करू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात थोडासा बदल करण्याची आवश्यकता आहे. हाडांची मजबुती कॅल्शिअम आणि मिनरल्सपासून असते. त्यामुळे हाडांना बळकट करण्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घ्यायला हवा.

हे सात पदार्थ देईल तुमच्या हाडांना बळकटी

पालक आणि अन्य हिरव्या पालेभाज्या

पालकची भाजी ही कॅल्शिअमचा मोठा स्रोत आहे. काही अभ्यासकांच्या मते १०० ग्रॅम पालकमध्ये ९९ मिलिग्रॅम कॅल्शिअम असते. त्यामुळे पालकच्या भाजीचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश करणे गरजेचे आहे. याशिवाय मेथी, पालक कोथिंबीर यातूनही कॅल्शिअम चांगले भेटू शकते.

केळी

केळी हे फळ मानवाला मिळालेले वरदान आहे. केळ्यात पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्निशियम, याचे खूप मोठे प्रमाण असते. हे तीनही घटक हाडांच्या मजबूतीसाठी खूप मदत करतात. त्यामुळे रोज सकाळी दोन केळी खाल्ल्याने हाडे बळकट होतात.

अंडी

अंड्यांमद्ये प्रोटीन आणि व्हिटामिन डी असते. व्हिटामिन डी हे हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे व्हिटामिन डी मुळे सांधेदुखी, गुडघेदुखी हे सर्व प्रकारचे आजार दूर होतात.

मासे

मासे हा मांसाहारी लोकांसाठी कॅल्शिअमची खुराक देणारा सर्वोत्तम आहार आहे. माशांमध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही. त्यामुळे हाडांना दुहेरी मजबुती मिळते.

संत्रे

संत्रे हे लिंबू वर्गीय फळ आहे. संत्र्यांमध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. संत्र्याचे रस हाडांची होणारी झीज भरून काढते. त्यामुळे आहारात संत्र्याचा समावेश करा.

बदाम

बदाम खाल्ल्याने स्नायूंना स्निग्धता प्राप्त होते. बदामात हाडांना आवश्यक कॅल्शियम, पोटॅशियम, ओमेगा ३ फॅटी अॅसिड हे घटक असतात. त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी बदामाचे सेवन जास्तीत जास्त करावे.

मनुके

अर्थरायटिसच्या समस्येवर मनुके खाणे फायदेशीर ठरते. मुनक्यांमध्ये इनुलिन नावाचे फायबर असते. हे फायबर शरीरासाठी कॅल्शिअम शोषून घेते. त्यामुळे हाडे मजबुत होतात. ऑस्टियोपिरॉसिस असलेल्या महिलांसाठी मुठभर मनुके खाणे फायद्याचे ठरते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास