Breakfast Special : रवा-चणा डाळीची स्पंजी इडली; घरच्या घरी बनवा झटपट रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Breakfast Special : रवा-चणा डाळीची स्पंजी इडली; घरच्या घरी बनवा झटपट रेसिपी

रव्याचा मऊपणा, हरभरा डाळीचा म्हणजेच चणा डाळीचा हलका कुरकुरीतपणा आणि फोडणीचा सुगंध यामुळे ही इडली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.

किशोरी घायवट-उबाळे

सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हलके, पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल, तर रवा-हरभरा डाळीची इडली हा उत्तम पर्याय आहे. रव्याचा मऊपणा, हरभरा डाळीचा हलका कुरकुरीतपणा आणि फोडणीचा सुगंध यामुळे ही इडली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. विशेष म्हणजे ही इडली कमी वेळात तयार होते आणि नारळाची चटणी, सांबार किंवा तुपासोबतही अप्रतिम लागते.

साहित्य :

  • १ कप रवा (सूजी)

  • १ टीस्पून हरभरा डाळ

  • १ टीस्पून मोहरी

  • १ टेबलस्पून तेल

  • १ टेबलस्पून आंबट दही

  • काही कढीपत्त्याची पाने

  • अर्धा इंच आले (किसलेले)

  • थोडे काजूचे तुकडे (ऐच्छिक)

  • पाव टीस्पून बेकिंग सोडा

  • चवीनुसार मीठ

  • सजावटीसाठी किसलेले गाजर

  • आवश्यकतेनुसार पाणी

कृती :

रव्याला फोडणी द्या

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हरभरा डाळ, कढीपत्ता, काजूचे तुकडे आणि किसलेले आले घाला. त्यानंतर रवा घालून २ ते ३ मिनिटे हलका भाजून घ्या.

दही मिसळा

रवा थंड झाल्यावर त्यात मीठ आणि आंबट दही घालून चांगले मिसळा. हे मिश्रण ३० मिनिटे झाकून ठेवा.

इडलीचे पीठ तयार करा

३० मिनिटांनंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून इडलीच्या पिठासारखे मिश्रण तयार करा. शेवटी बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने मिसळा.

इडली वाफवा

इडलीच्या साच्यांना हलके तेल लावून प्रत्येक साच्यात थोडे किसलेले गाजर घाला. त्यावर तयार पीठ ओतून १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या.

गरमागरम सर्व्ह करा

इडल्या तयार झाल्यानंतर त्या बाहेर काढा आणि तूप, नारळाची चटणी किंवा भाजलेल्या हरभरा डाळीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

परफेक्ट रवा इडलीसाठी खास टिप्स :

  • रवा हलका भाजल्यास इडलीचा स्वाद आणि पोत अधिक छान लागतो.

  • दही आंबट असल्यास इडली अधिक मऊ आणि स्पंजी बनते.

  • बेकिंग सोडा शेवटी घाला आणि पीठ जास्त ढवळू नका.

  • गाजरासोबत बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा मटारही घालू शकता.

  • इडली वाफवल्यानंतर २ मिनिटे थंड होऊ द्या, मगच साच्यातून काढा.

  • तूप, सांबार, नारळाची चटणी किंवा भाजलेल्या हरभरा डाळीच्या चटणीसोबत ही इडली अधिक स्वादिष्ट लागते.

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई

दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना-विकीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा! छोट्या विहानच्या गोड फोटोने वेधलं लक्ष

Mumbai : पावसासंबंधी माहिती वॉलवर; मुख्यालयासह परळ येथील नियंत्रण कक्ष होणार हायटेक

Mumbai : स्थायी समितीत जोरदार आतषबाजी; आधी खर्च, नंतर मंजुरी; स्थायी समितीत ५ ते ७५ लाखांचे ९० टक्के प्रस्ताव

Mumbai : केईएमचा ४२२ कोटींचा शैक्षणिक संकुल प्रकल्प; BMC डिसेंबरमध्ये काढणार निविदा