लाईफस्टाईल

Leather Products for Women : हँडबॅग ते फुटवेअर! महिलांसाठी लेदरच्या कोणत्या वस्तू उपयुक्त?

फॅशनपासून ते दैनंदिन वापरापर्यंत महिलांसाठी लेदरच्या अनेक वस्तू अत्यंत उपयुक्त ठरतात. टिकाऊपणा, आकर्षक डिझाइन आणि दीर्घकाळ वापरता येण्यामुळे लेदरच्या वस्तूंना मोठी मागणी असते.

किशोरी घायवट-उबाळे

आज (दि.१) संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अर्थसंकल्पात मूलभूत सीमा शुल्कात (Basic Customs Duty) सवलती जाहीर केल्या असून, यामुळे लेदर आणि लेदरपासून बनणाऱ्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. या निर्णयाचा थेट फायदा ग्राहकांना, विशेषतः महिलांना होणार आहे.

फॅशनपासून ते दैनंदिन वापरापर्यंत महिलांसाठी लेदरच्या अनेक वस्तू अत्यंत उपयुक्त ठरतात. टिकाऊपणा, आकर्षक डिझाइन आणि दीर्घकाळ वापरता येण्यामुळे लेदरच्या वस्तूंना मोठी मागणी असते.

महिलांसाठी उपयुक्त असलेल्या लेदरच्या वस्तू

हँडबॅग आणि स्लिंग बॅग : लेदर हँडबॅग, टोट बॅग आणि स्लिंग बॅग्स महिलांच्या दैनंदिन वापरात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. ऑफिस, कॉलेज किंवा प्रवासासाठी या बॅग्स उपयुक्त ठरतात.

लेदर फुटवेअर : लेदरचे सँडल्स, शूज, फ्लॅट्स आणि ऑफिस फुटवेअर अधिक टिकाऊ आणि आरामदायी असतात.

पर्स आणि वॉलेट्स : महिलांसाठी लेदर पर्स, कार्ड होल्डर्स आणि क्लच पर्स स्टाइलसोबतच सुरक्षित वापरासाठी चांगले ठरतात.

बेल्ट आणि अ‍ॅक्सेसरीज : लेदर बेल्ट, वॉच स्ट्रॅप्स आणि ब्रेसलेट्स फॅशन अ‍ॅक्सेसरी म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

जॅकेट्स आणि फॅशनवेअर : हिवाळ्यात लेदर जॅकेट्स महिलांसाठी फॅशनेबल आणि उबदार पर्याय ठरतात.

ऑफिस व ट्रॅव्हल अ‍ॅक्सेसरीज : लेदर लॅपटॉप बॅग, फाइल फोल्डर आणि ट्रॅव्हल पाऊचेस बिझनेस वूमनसाठी उपयुक्त असतात.

फुटवेअर व बॅग रिपेअर प्रॉडक्ट्स : लेदर स्वस्त झाल्यामुळे दुरुस्ती आणि देखभाल साहित्यही परवडणारे होणार आहे.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग