गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय टुरिस्ट डेस्टिनेशनपैकी एक असून, सुंदर समुद्रकिनारे, नाईटलाइफ, ऐतिहासिक ठिकाणे, पोर्तुगीज वारसा आणि स्वादिष्ट सीफूडसाठी प्रसिद्ध आहे. अनेकांना वाटते की गोव्यात फिरण्यासाठी खूप खर्च येतो, परंतु काही स्मार्ट ट्रॅव्हल टिप्स वापरून तुम्ही अगदी बजेटमध्ये गोव्याची ट्रिप प्लॅन करुन मनसोक्त आनंद घेऊ शकता.
१) योग्य वेळेची निवड: बजेटमध्ये गोवा फिरायचे असल्यास, ऑफ-सीझन म्हणजे फेब्रुवारी ते ऑक्टोबर दरम्यानची वेळ निवडा. या काळात हॉटेल्स आणि विमानांचे दर कमी असतात आणि पर्यटकांची गर्दीही तुलनेने कमी असते.
२) परवडणाऱ्या निवासाची निवड करा: महागड्या रिसॉर्ट्स किंवा हॉटेल्सऐवजी, होस्टेल्स, गेस्ट हाऊस किंवा होमस्टेचा पर्याय निवडा. ऑनलाइन बुकिंग साइट्सवर सवलती पाहा आणि त्यानुसार बुकिंग करा. दक्षिण गोव्यातील बीच हट्सही बजेटमध्ये चांगला पर्याय ठरू शकतात.
३) वाहतुकीचा स्मार्ट वापर करा: गोव्यातील वाहतूक खर्चिक ठरू शकते, विशेषतः टॅक्सी वापरल्यास खर्च भरमसाठ वाढेल. त्यामुळे खालील पर्याय वापरु शकता:
स्कूटी किंवा बाइक भाड्याने घ्या: दररोज ३०० ते ५०० रुपयांमध्ये स्कूटी उपलब्ध होते.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर: स्थानिक बस आणि शेअर्ड ऑटोने स्वस्तात प्रवास करू शकता.
फेरी सेवेचा वापर: विशेषतः उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या दरम्यान फिरण्यासाठी फेरी सेवेचा लाभ घ्या, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील.
गोवा नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे, पण क्लब्समध्ये एंट्री फी जास्त असते. त्याऐवजी बीच पार्ट्या किंवा ओपन-एअर म्युझिक फेस्टिव्हल्सला जा, जिथे कमी खर्चातही तुम्ही एन्जॉय करू शकता.
५) स्थानिक खाद्याचा आस्वाद: प्रसिद्ध कॅफे आणि महागड्या रेस्टॉरंट्सऐवजी, स्थानिक स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्या. गोव्यातील स्थानिक खाद्यपदार्थ चविष्ट आणि स्वस्त असतात. सीफूड आणि गोवन थाळी ही स्थानिक हॉटेल्समध्ये स्वस्त आणि स्वादिष्ट मिळतात.
६) स्थानिक बाजारपेठांमध्ये (फ्ली मार्केट, म्हापसा मार्केट) खरेदी करताना दर कमी करण्यासाठी 'बार्गिनिंग' करा. दुकानदार सांगेल ती किंमत देऊ नका, कारण पर्यटकांना बघून किंमत अव्वाच्या सव्वा सांगितली जाते. त्यामुळे योग्य भाव ठरवूनच खरेदी करा.