छायाचित्र सौ. - Freepik
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात प्या विलायचीचे थंड सरबत; पोटाला मिळेल आराम; रेसिपी आहे खूप सोपी

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शरिराला गारवा प्रदान करणारे पेय पदार्थ पिण्याकडे अनेकांचा ओढा असतो. वेलचीचे सरबत उन्हाळ्यात पोटाला थंड ठेवते.

Kkhushi Niramish

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शरिराला गारवा प्रदान करणारे पेय पदार्थ पिण्याकडे अनेकांचा ओढा असतो. वेलचीचे सरबत उन्हाळ्यात पोटाला थंड ठेवते. कडक उन्हाळ्यातही आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या काय आहे रेसिपी...

साहित्य -

१ लिटर पाणी

अर्धा कप साखर (किंवा चवीनुसार)

८-१० हिरव्या वेलची (सोलून बारीक केलेल्या)

१ लिंबाचा रस

काळे मीठ

बर्फाचे तुकडे

पुदिन्याची पाने (सजावटीसाठी)

वेलची सरबत बनवण्याची पद्धत

एका पॅनमध्ये ४ कप पाणी घ्या आणि त्यात चवीनुसार साखर घाला आणि मिक्स करा.

साखर पूर्णपणे विरघळू द्या म्हणजे सरबत चविष्ट होईल.

यानंतर, साखर विरघळलेल्या पाण्यात बारीक कुटलेली वेलची मिसळा.

वेलचीचा स्वाद आणि सुगंध पाण्यात चांगल्या प्रकारे शोषला जावा म्हणून ते १०-१५ मिनिटे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

पाणी थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस, काळे मीठ आणि पुदिन्याची पाने घाला.

सर्वात शेवटी बर्फ घालून लगेच सर्व्ह करा.

सरबत अधिक चविष्ट बनवण्यासाठी, पुदिन्याची पाने आणि लिंबाच्या फोडींनी सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

वेलचीचे सरबत पिण्याचे आरोग्यासाठी फायदे

  • पचनास मदत करते- हे सरबत पोटातील उष्णता, आम्लता आणि अपचन दूर करते.

  • एनर्जी बूस्टर- वेलचीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतात.

  • तोंडाची दुर्गंधी दूर करते - वेलची तोंडाची दुर्गंधी दूर करते आणि तोंडाला ताजेतवाने बनवते.

  • हृदयासाठी फायदेशीर - रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video