प्रातिनिधिक छायाचित्र 
लाईफस्टाईल

करिअर निवडताना चुकू नका; योग्य निर्णय घेण्यासाठी १० महत्त्वाच्या टिप्स

करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही, तर आवड, कौशल्य, संधी आणि मूल्य यांचा संगम आहे. योग्य योजना, सतत सुधारणा आणि पर्यायी पर्याय ठेवणे यातूनच करिअर घडवता येते. करिअरमध्ये पालकांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या करिअर निवडीच्यावेळी दबाव टाकू नये. स्वतःची स्वप्ने पूर्ण करणारे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहू नये. कल चाचणी...

Krantee V. Kale

करिअर हा शब्द ऐकल्यावर आपल्याला लगेच नोकरी, पैसा कमावणे किंवा व्यवसाय यांचा विचार येतो. पण खरेतर करिअर फक्त उपजीविकेपुरते मर्यादित नाही; ते आपल्या आयुष्याचा दीर्घकालीन प्रवास आहे, जो आपल्या आवडी, कौशल्य, शिक्षण आणि जीवनमूल्य यांवर आधारित असतो. त्यामुळे योग्य करिअर निवड म्हणजे मानसिक समाधान होय. पण योग्य करिअर निवडण्यासाठी कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत याचा विचार पालक आणि मुलांनी करावा त्यासाठीच्या या टिप्स-

१. स्वतःच्या आवडीकडे लक्ष द्या.

कोणत्या कामात आनंद मिळतो याचा विचार करा. आवड आणि छंदावर आधारित करिअर दीर्घकाळ टिकते.

२. स्वतःमधील कौशल्य माहीत पाहिजेत

तुम्हाला कोणत्या गोष्टी व्यवस्थित जमतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. तेच तुमचे प्लस पॉइंट असतात. उदा. लेखन, गणित, लोकांशी संवाद अशा अनेक कौशल्यांपैकी स्वतःला काय जमतंय हे लक्षात घेऊन करिअर ठरवा.

३. फक्त पदवीवर अवलंबून राहू नका

आज फक्त डिग्री पुरेशी नाही; प्रॅक्टिकल कौशल्यही महत्त्वाचे आहे. संगणक, इंग्रजी कम्युनिकेशन ही कौशल्ये जमली पाहिजेत त्यासाठी या गोष्टींचा नियमित सराव ठेवा.

४. इतरांच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका

आई-वडील किंवा मित्रांचे म्हणणे विचारात घ्या, पण अंतिम निर्णय स्वतःच घ्या. कारण आयुष्यभर करिअर हे स्वतःला करायचे असते. त्यातल्या आव्हानांना सामोरे जाताना प्रत्यक्षात कोणी उपयोगी पडत नसतात.

५. बाजारातील संधी आणि मागणी पहा

करिअर निवडताना त्या क्षेत्राची भविष्यातील गरज लक्षात घ्या. उदाहरण : AI, डेटा सायन्स यांतील नोकऱ्या वाढत आहेत.

६. Plan B तयार ठेवा

पहिल्या प्रयत्नात यश मिळत नसेल तर दुसऱ्या पर्यायाची तयारी ठेवा. शिक्षक न झाल्यास पत्रकारिता, लेखन, ऑफिस वर्क इत्यादी पर्याय विचारात घ्या. डॉक्टर होणे जमले नाही तर लॅब, मेडिकल टेक्निशियन व्हा. असे पर्याय शोधून Plan B तयार ठेवा.

७. आवड आणि अर्थार्जन यांचा समतोल साधा

पोटासाठी करिअर किंवा आवडीचे करिअर या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. पैसा कमावणे महत्त्वाचे, पण आवडही टिकवणे आवश्यक आहे. पण आधी पैशाला महत्त्व दिले पाहिजे, कारण पैसा असेल तर त्या जोडीला आपली आवडही जपता येते. परंतु या दोन्ही गोष्टींची सांगड घालता आली तर उत्तमच.

८.निवडलेल्या करिअरमध्ये सतत अपडेट ठेवा

नव्या कौशल्यांचा अभ्यास करा, साइड-हसल किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत तयार ठेवा. नोकरी बदलणे किंवा उद्योजकतेकडे वळणे सामान्य आहे. करिअरमधील अपडेट माहीत असतील तर प्रगती जलद गतीने होते.

९.स्थान आणि संधी लक्षात घ्या

मुंबईसारख्या शहरात संधी जास्त, पण स्पर्धाही खूप आहे. ग्रामीण भागात पर्यटन, शेती, फिशरी, डिजिटल सेवा यांसारखी क्षेत्रे आहेत. त्याकडेही लक्ष द्या.

१०.करिअरची चाचणी करा

नववी-दहावी दरम्यान करिअर निवडीसाठी कल चाचणी करून करिअरची योग्य दिशा ठरवा. चुकीची वळणे टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच योजना आखणे महत्त्वाचे आहे.

पालकांची भूमिका : करिअरमध्ये पालकांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या करिअर निवडीच्यावेळी त्यांच्यावर दबाव टाकू नये. स्वतःची स्वप्ने पूर्ण करणारे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहू नये. कल चाचणी आवर्जून करावी. मुलांमधील क्षमता, कमतरता ओळखून त्यांची जाणीव मुलांना करून द्यावी. मुलांशी सुंदवाद, चर्चा कराव्यात. आर्थिक गणिते जुळतील याचा विचार करून मुलांना त्याची जाणीव करून द्यावी. तसेच मुलांना काय वाटते तेही जाणून घ्यावे. काहीच ठरत नसेल तर करिअर काऊन्सलर किंवा तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे