Ai Generated Image
लाईफस्टाईल

Chaitra Navratri 2025 3rd Day Puja : नवदुर्गेचे तिसरे स्वरुप देवी चंद्रघटा; जाणून घ्या योग्य पूजा, विधी

चैत्र नवरात्रीचा आजचा तिसरा दिवस असून नवदुर्गेचे तिसरे स्वरुप चंद्रघंटा देवीचे आहे. देवीचे हे रुप अत्यंत मंगलदायी आणि ममतामय आहे. देवीचे हे स्वरुप शांत असून देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. त्यामुळे देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असे नाव आहे.

Kkhushi Niramish

चैत्र नवरात्रीचा आजचा तिसरा दिवस असून नवदुर्गेचे तिसरे स्वरुप चंद्रघंटा देवीचे आहे. देवीचे हे रुप अत्यंत मंगलदायी आणि ममतामय आहे. देवीचे हे स्वरुप शांत असून देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. त्यामुळे देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असे नाव आहे. चंद्रघंटा देवीची योग्य पूजा केल्याने मन शांत तसेच खंबीर होते. देवीचे हे रुप फारच अद्भूत आहे. जाणून घ्या चंद्रघंटा देवीची पूजा कशी करावी. काय आहे विधी आणि योग्य पद्धत...

कसे आहे चंद्रघंटा देवीचे स्वरुप?

देवी भागवत पुराणानुसार, आई चंद्रघंटा यांचे रूप अत्यंत शांत, सौम्य आणि प्रेमळ आहे, जे आपल्या भक्तांना सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करते. या दिवशी विशेष पूजा केल्याने आत्मविश्वास वाढतो, जीवनात समृद्धी येते आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढते. भक्तीमुळे लोक तुमचा अधिक आदर करू लागतात. माँ चंद्रघंटाचे हे रूप विशेषतः साधे आणि शांतीने भरलेले आहे. चंद्रघंटाची पूजा केल्याने केवळ भौतिक सुखच वाढत नाही तर समाजात तुमचा प्रभावही वाढतो.

चंद्रघंटा देवीची पूजा कशी करावी?

चंद्रघंटा देवीची पूजा करण्यासाटी ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळ करून घ्या. स्वच्छ धुतलेले कपडे घाला. चंद्रघंटा देवीची पूजा सूर्योदयापूर्वी करावी. कारण यामुळे देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. देवीची पूजा करताना चंद्रघंटा देवीला लाल आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच पूजेतही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र घालावे. देवी चंद्रघंटेला कुंकू लावावे. पिवळ्या रंगाची फुले वाहावी. देवी चंद्रघंटेला दुधापासून बनवलेल्या खीरचा भोग अर्पण करावा. सोबतच दुधापासून बनवलेली मिठाई देखील देवीला अर्पण करू शकता. दुर्गासप्तशतीचा पाठ करून देवी चंद्रघंटाची आरती करावी.

लाल रंगाचे महत्त्व

देवी चंद्रघंटा ही शांत, सौम्य आहे. तसेच ती शक्ती आणि साहसाचे प्रतिक आहे. त्यामुळे देवी चंद्रघंटाची पूजा करताना आणि या दिवशी लाल रंगाचे कपडे घालण्याला महत्त्व आहे. त्यामुळे यादिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली