Canva
लाईफस्टाईल

Chaitra Navratri 2025 : चैत्र नवरात्रीचा आज दुसरा दिवस जाणून घ्या देवीचे ब्रह्मचारिणी रूप कसे आहे? जाणून घ्या पूजा, विधी

चैत्र नवरात्रीला रविवारी (दि.३०) पासून सुरुवात झाली असून काल प्रथम स्वरुप शैलपुत्रीची पूजा करण्यात आली. तर चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आज देवीच्या ब्रह्मचारिणीस्वरुपाची पूजा केली जाते. या दिवशी पांढरे शुभ्र वस्त्र घालण्याचे महत्त्व आहे. जाणून घेऊया देवीच्या या ब्रह्मचारिणी रुपाबद्दल अधिक माहिती...

Kkhushi Niramish

चैत्र नवरात्रीला रविवारी (दि.३०) पासून सुरुवात झाली असून काल प्रथम स्वरुप शैलपुत्रीची पूजा करण्यात आली. तर चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आज देवीच्या ब्रह्मचारिणीस्वरुपाची पूजा केली जाते. या दिवशी पांढरे शुभ्र वस्त्र घालण्याचे महत्त्व आहे. जाणून घेऊया देवीच्या या ब्रह्मचारिणी रुपाबद्दल अधिक माहिती...

देवी ब्रह्मचारिणीचे रूप कसे आहे?

देवी ब्रह्मचारिणीचे रूप अतिशय शांत आणि सुंदर आहे. ती पांढरे कपडे घालते. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात पाण्याचा भांडे आहे. श्वेत वस्त्र हे शांती आणि पवित्रतेचे प्रतिक आहे. तर उजव्या हातातील जपमाळ ज्ञान आणि तपश्चर्येचे प्रतिक आहे. तर डाव्या हातातील कमंडलू ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतिक आहे. देवी अत्यंत शांत स्वभावाची असून खूप दयाळू आहे. तर देवी ब्रह्मचारिणी तपश्चर्या आणि त्यागाची देवी मानली जाते.

देवी ब्रह्मचारिणी सर्व विद्येची जाणकार

देवी ब्रह्मचारणी ही या संपूर्ण सृष्टीतील सर्व प्रकारच्या विद्येची तसेच ज्ञानाची जाणकार आहे. देवी ब्रह्मचारिणीची आराधना केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते. देवी ब्रह्मचारिणीला सर्व शास्त्रांचे ज्ञान आहे. देवी आपल्या भक्तांना आपले सर्व ज्ञान देऊन विजयी करते.

देवी ब्रह्मचारिणीला प्रसादासाठी कोणता भोग अर्पण करतात?

देवी ब्रह्मचारिणीला खडी साखर किंवा साखरेचा भोग अर्पण करतात.

देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी?

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जशी शास्त्रीय पद्धतीने शैलपूत्री देवीची पूजा करतात त्याचप्रमाणे देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान केल्यानंतर, पूजास्थळावर गंगाजल शिंपडा आणि संपूर्ण कुटुंबासह देवी दुर्गाची पूजा करा. ब्रह्मचारिणी मातेच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे घाला आणि फक्त पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करा. पंचामृताने आईला स्नान घालल्यानंतर, हळद आणि कुंकू अर्पण करा. यानंतर, हवन करा त्यामध्ये लवंग, बताशा इत्यादी हवन समाग्री अर्पण करा. ब्रह्मचारिणी मातेच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फळे, फुले इत्यादींचा वापर करा.

देवीला फक्त दुधाचे पदार्थ किंवा साखर अर्पण करा. यासोबतच, मनात आईच्या ध्यान मंत्राचा जप करा आणि त्या दरम्यान संपूर्ण कुटुंबासह आईची स्तुती करत रहा. त्यानंतर, सुपारी अर्पण करावी. सुपारी अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करा. नंतर कलश देवता आणि नवग्रहांची पूजा करा. यानंतर, तुपाचा दिवा आणि कापूर लावून देवीची आरती करावी. त्यानंतर दुर्गा चालीसा, दुर्गा सप्तशती इत्यादींचे पठण करावे. पूजा केल्यानंतर, देवीची स्तुती करावी. संध्याकाळी देखील देवीची आरती करावी.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली