लाईफस्टाईल

तुम्हीही रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर होतील गंभीर परिणाम, वाचा तज्ज्ञांचा इशारा

आधुनिक जीवनशैलीत चहा-कॉफीच्या विविध प्रकारांचा ट्रेंड वाढला असला, तरी तज्ज्ञांच्या मते रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे...

किशोरी घायवट-उबाळे

अनेकजण सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. काहीजण दिवसातून अनेकदा चहाचं सेवन करतात. आधुनिक जीवनशैलीत चहा-कॉफीच्या विविध प्रकारांचा ट्रेंड वाढला असला, तरी तज्ज्ञांच्या मते रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पोटाच्या समस्या, झोपेचे विकार आणि मानसिक तणाव वाढण्याचा धोका असतो.

संशोधकांच्या माहितीनुसार, रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यास पोटात आम्ल (ॲसिड) अधिक प्रमाणात तयार होते. त्यामुळे ॲसिडिटी, जळजळ आणि गॅस्ट्राइटिस (Gastritis) सारख्या समस्या उद्भवू शकतात. पोटात अन्न नसताना तयार होणारे अतिरिक्त आम्ल पोटाच्या आतील संरक्षक थराला नुकसान पोहोचवतात. याशिवाय रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्याने पोट फुगणे, मळमळ आणि सूज यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

तज्ज्ञ सांगतात की, जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्याने झोपेवरही परिणाम होतो. यामुळे अनिद्रा, तुटक झोप आणि चिंतेची समस्या वाढू शकते. कॅफिनमुळे शरीरात तणाव निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढून अस्वस्थता जाणवू शकते. तसेच, कॅफिनचे जास्त सेवन केल्यास शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) आणि पोषक घटकांचे शोषण कमी होण्याची शक्यता असते.

चहा किंवा कॉफीमध्ये साखर घालून सेवन केल्यास दातांच्या एनॅमल (Tooth Enamel)चे नुकसान होऊन दातांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे, थकवा आणि डोकेदुखी यांसारखे त्रासही जाणवू शकतात. नियमित कॅफिनचे सेवन वाढले तर त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ जाणवू शकतात.

संतुलित जीवनशैलीसाठी योग्य पर्याय

तज्ज्ञांच्या मते, कॅफिनयुक्त पेयांऐवजी कोमट पाणी आणि मध, आयुर्वेदिक हर्बल ड्रिंक (Herbal Tea), धणे पाणी (Coriander Water), हळद आणि कोमट पाणी, तुळशीचा काढा, जिरे पाणी (Jeera Water) या आयुर्वेदिक हर्बल पेयांचा पर्याय निवडल्यास शरीराला दीर्घकालीन फायदे मिळू शकतात. नैसर्गिक घटकांनी तयार केलेले पेय रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आरोग्य संतुलित ठेवण्यास मदत करू शकते. संतुलित आहार आणि योग्य सवयींसह अशा पेयांचा समावेश केल्यास निरोगी जीवनशैली राखणे सोपे होऊ शकते.

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून यलो-ऑरेंज अलर्ट

CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video

आता वेटिंगचं नो टेन्शन! IRCTC च्या AI फीचर्समुळे रेल्वे तिकीट होणार मिनिटांत बुक; जाणून घ्या सीक्रेट ट्रिक

डेंग्यूची भीती आता कमी होणार? भारतात पहिली QDENGA लस; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

'मी मॅन-हेटर आहे'; 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील वक्तव्यानंतर शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई? जाणून घ्या नेमकं प्रकरण